Sai Resort  Saam Tv
महाराष्ट्र

Ratnagiri News: साई रिसॉर्ट घोटाळाप्रकरणी अटकसत्र सुरुच, दापोलीतील सरकारी अधिकाऱ्याला अटक

Sai Resort Scam: सुधीर पारदुले यांच्या अटकेनंतर किरीट सोमैया यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : रत्नागिरीच्या दापोलीतील साई रिसॉर्ट घोटाळा प्रकरणी आज तिसरी अटक झाली आहे. सदानंद कदम आणि जयराम देशपांडे यांच्यानंतर आता मंडळ अधिकारी सुधीर पारदुले यांना दापोली पोलिसांनी अटक केली आहे.

सुधीर पारदुले यांना अटकेनंतर दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सुधीर पारदुले यांच्या अटकेनंतर किरीट सोमैया यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे.

दोनच दिवसांपूर्वी ईडीने दापोलीतील तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांना अटक केली होती. साई रिसॉर्टच्या कामासाठी बेकायदेशीर परवानगी दिल्याचा ठपका देशपांडे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. (Latest Marathi News)

यापूर्वी प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांचं शासनाकडून निलंबन करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांची चौकशी सुरू होती. पदावर असताना अनियमितता आरोपाखाली देशपांडे यांचं निलंबन करण्यात आलं होतं.

त्याआधी काही दिवसांपूर्वा रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांना ईडीने अटक केली होती. सदानंद कदम हे ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) यांचे व्यावसायिक भागीदार आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या खेडमधील सभेसाठी सदानंद कदम यांनी मोठी ताकद लावल्याची चर्चा होती. त्यानंतर त्यांना ईडीने अटक केल्यांतर उलट सुलट चर्चा झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: मलबार हिलमधून मंगल प्रभात लोढा यांची विजयाकडे वाटचाल

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, प्रवीण दरेकर यांचं मोठं वक्तव्य

Bribe Case : गुन्हा दाखल न करण्यासाठी ३० हजारांची लाच; राज्य उत्पादन शुल्कचे उपनिरीक्षकासह पंटर ताब्यात

Cardamom Benefits: बहुगुणी वेलचीचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहे का?

Jharkhand Election Result: झारखंडमध्ये भाजपला धक्का, इंडिया आघाडीनं बहुमत गाठलं, कुणाला किती जागांवर आघाडी?

SCROLL FOR NEXT