Rain, Ratnagiri Rain Update, Chiplun, Rajapur, Lanja, Dapoli. Saam Tv
महाराष्ट्र

दापोली, गुहागर, चिपळूण, लांजा, राजापूरात अतिवृष्टी; मंगळवारपर्यंत पावसाचा जाेर राहणार

शनिवारी रात्री पासून रत्नागिरीतील विविध भागात पावसाने जाेर धरला हाेता.

साम न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : गेल्या दाेन दिवसांत रत्नागिरीत (ratnagiri) पावसाने (rain) जोर धरला हाेता. रत्नागिरी (ratnagiri latest marathi news) जिल्ह्यातील विविध भागात शनिवार सकाळ पासून रविवारी रात्रीपर्यंत झालेल्या पावसामुळे सखल भागात माेठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. बहुतांश भागात पावसानं अक्षरक्षः धुमाकुळ घातला होता. जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नाेंद झाली आहे अशी माहिती प्रशासनाने दिली. (rain updates in marathi)

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनूसार आज (साेमवार) सकाळी साडे आठ वाजपेर्यंत नाेंदविलेल्यानूसार 24 तासांमध्ये दापोली (dapoli), गुहागर, चिपळूण (chiplun) , लांजा (lanja), राजापूर (rajapur) तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे. सर्वाधिक पावसाची नोंद राजापूर तालुक्यात 130 मिली मीटर इतकी झाली.

दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातील काेळकेवाडी धरण व्यवस्थापनाकडून धरण क्षेत्रातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. रत्नागिरीत 28 जून पर्यंत जाेरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. समुद्रातील वा-याचा वेग देखील जास्त असल्यानं मच्छीमारांनी (fisherman) समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असे आवाहन देखील प्रशासनाने केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईतून अटक; महिलेसोबत नको ते कृत्य केलं, नंतर...

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

Health Tips: दुप्पट वेगाने कमी होईल वजन; आहारात फक्त या एका गोष्टीचा करा समावेश, ३२ वरून २८ होईल कंबर

SCROLL FOR NEXT