Ratnagiri, landslide, landslides, ratnagiri rain saam tv
महाराष्ट्र

Ratnagiri Landslide News : रत्नागिरीत पावसाचा कहर... संगमेश्वर तालुक्यात भूस्खलन, घरावर दरड कोसळली; 80 नागरिकांचे स्थलांतर (पाहा व्हिडिओ)

Ratnagiri Rain News : रत्नागिरी जिल्ह्यात नद्यांना पूर आल्याने अनेक घरांत, शेतांत पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले.

अमोल कलये

Ratnagiri Rain Update : रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जाेर सुरुच आहे. या जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील देवरुख कोंढरणमध्ये भुस्खलनाची घटना गुरुवारी घडली. यामुळे कोंढरण गावातील 50 घरातील 80 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. (Maharashtra News)

रत्नागिरी जिल्ह्यात सततच्या पडणा-या मुसळधार पावसामुळे भुस्खलनाच्या घटना तसेच दरड काेसळण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. जिल्ह्यातील कोंढरण गावात एका घरावर दरड कोसळली. सुदैवाने या घटनेत काेणतीही जीवित हानी झालेली नाही. या गावातील रस्त्यांना, जमिनीला आणि येथील घरांना भेगा पडल्या आहेत. दरम्यान प्रशासनाने तुलसणी हायस्कुलमध्ये रहिवाशांचे स्थलांतर केले आहे.

आयएमडीने रत्नागिरी जिल्ह्यासाठी गुरुवारी पावसाचा (rain) रेड अलर्टची शक्यता वतर्वली हाेती. ही शक्यता गृहीत धरुन जिल्हा प्रशासन अलर्ट माेडवर राहिले. दरम्यान जिल्ह्यात आजही (शुक्रवार) पावसाचा जाेर सुरुच आहे. पावसामुळे काजळी नदीसह बावनदीला पूर आला.

दरम्यान अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये यासाठी शाळा (अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व प्राथमिक 1 ली ते 7 वी पर्यंत) विद्यालयांना आज (शुक्रवार, ता. 28) सुट्टी जाहीर केल्याचा आदेश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी काढला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : ...म्हणूनच रोहित पवार आमदार झाला, अजित पवारांचा टोला

Wardha News : मनाला चटका लावणारी घटना; शेतावर फवारणीसाठी गेलेल्या तरूण शेतकऱ्याचा मृत्यू

Crime News: घरात चोर शिरल्याचा संशय, नवऱ्यानं उघडला बायकोच्या रुमचा दरवाजा, दृश्य पाहून धक्काच बसला

Maharashtra Live News Update: पीक विम्याचे निकष बदलण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार - मंत्री दत्तात्रय भरणे

Weight Gain : वजन वाढवण्यासाठी गाईचे दूध प्यावे की म्हशीचे दूध?

SCROLL FOR NEXT