Ratnagiri School And College 
महाराष्ट्र

Ratnagiri Rain Update: मुसळधार पावसामुळे रत्नागिरीतील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

Ratnagiri School And College: रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडलीय. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे.

Bharat Jadhav

दोन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावासाने रत्नागिरी जिल्ह्यात दाणादाण उडवून दिली. मुसळधार पावासामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झालाय. जिल्ह्यातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलीय. हवामान विभागाने उद्याही मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशारा दिलाय. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं उद्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केलीय. खबरदारी म्हणून जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आलीय.

जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सोमवारी सुट्टी जाहीर करण्यात आलीय. यामध्ये सर्व अंगणवाडी, पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयांचा समावेश असून त्यासंबंधीचा आदेश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी जारी केलाय. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, प्रादेशिक हवामान विभागाच्या पूर्वसूचनेवरुन जिल्ह्यातील त्या-त्या भागातील स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन संपूर्ण जिल्ह्याकरिता अथवा जिल्ह्यातील ठराविक स्थानिक क्षेत्रातील शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत.

दरम्यान राज्यभरात पावसाचा जोर वाढलाय. मुसळधार पावासामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर पाणीच पाणी झालंय. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेचा एक भयंकर व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओत कमरेइतके पाणी या एक्स्प्रेसवेवर साचलेलं दिसत आहे. खोपोलीजवळ बोरघाटात अमृतांजन पुलाजवळ कमरेइतके पाणी साचलंय.

तर कोकणमधील रेल्वे वाहतुकीलाही मुसळधार पावसाचा फटका बसलाय. विन्हेरे व दिवाणखवटी स्टेशन दरम्यान बोगद्याजवळ ट्रॅकवर माती आल्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक बंद झालीय. दिवाण खवटी बोगद्याजवळ रेल्वे रुळांवर दरड आल्याने कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. महाडमधील विन्हेरे स्टेशन जवळ नागरकोईल गांधीधाम एक्स्प्रेस थांबवण्यात असून गाडीतील प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. येथील स्थानिकांनी ग्रामस्थांनी रेल्वे प्रवाशांसाठी चहा, बिस्किटे आणि पाणी बॉटल पुरवल्या.

जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडली

हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार रत्नागिरी जिल्ह्यात सोमवारी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु असल्याने खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT