ratnagiri news Death of whale found on Ganpatipule beach Saam TV
महाराष्ट्र

Whale Fish Death: गणपतीपुळे समुद्रकिनारी आढळलेल्या व्हेल माशाचा अखेर मृत्यू, जीव वाचवण्यासाठी सुरू होती धडपड

Ganpatipule Whale Fish Death: गेल्या दोन दिवसांपासून ग्रामस्थांसह प्रशासनाकडून या माशाचा जीव वाचवण्याचे प्रयत्न सुरू होते.

Satish Daud

Ganpatipule Whale Fish Death

गणपतीपुळे समुद्रकिनारी आढळून आलेल्या व्हेल माशाच्या पिल्लाचा अखेर मृत्यू झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून ग्रामस्थांसह प्रशासनाकडून या माशाचा जीव वाचवण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना अखेर अपयश आलं आहे. बुधवारी रात्री व्हेल माशाच्या पिल्लाचा अखेर मृत्यू झाला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दोन दिवसांपूर्वी गणपतीपुळे येथील समुद्रकिनाऱ्याजवळ ग्रामस्थांना व्हेल माशाचं पिल्लू बेशुद्ध अवस्थेत आढळून आलं होतं. या पिल्लाची प्रकृती खालावलेली होती. ग्रामस्थानी या घटनेची माहिती वनविभागाला दिली. वनविभागाकडून या व्हेल माशाला जिवंत ठेवण्यासाठी कसरत सुरू होती.

कापडामध्ये गुंडाळून त्याच्यावर दिवसभर पाण्याचा मारा केला जात होता. भरती सुरू झाल्यानंतर मंगळवारी सायंकाळी उशिरापर्यंत या माशाला जेसीबीच्या सहाय्याने समुद्रात सोडण्यात आले होते.

मात्र, बुधवारी हे पिल्लू पुन्हा समुद्रकिनारी आले. २० फुटांहून अधिक लांब आणि ५ ते ६ टन इतके या माशाच्या पिल्लाचे वजन होते. पर्यटक, स्थानिक, तज्ज्ञ, एमटीडीसीचे अधिकारी तसेच वनविभागाचे अधिकारी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, या व्हेल माशाच्या पिल्लाचा अखेर मृत्यू झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये कोल्हापूरच्या सोनम मस्करचा लक्षवेध, १० मीटर एअर रायफल प्रकारात रौप्य पदक

Ganesh Visarjan: गणेशोत्सवाला गालबोट! विसर्जन करताना इंजिनिअरिंगच्या २ विद्यार्थ्यांचा मृत्यू

Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीची तब्येत बिघडली; रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत

Hill Station: मडगावपासून फक्त 2 किमी अंतरावर आहे हे हिल स्टेशन; मुंबईकरांचं फेव्हरेट डेस्टिनेशन

konkan Beach : महाराष्ट्रातील मिनी मालदीव! कोकणातील समुद्राच्या सौंदर्याला तोड नाही, एकदा फेरफटका माराच

SCROLL FOR NEXT