Ratnagiri News Saam tv
महाराष्ट्र

Ratnagiri News : शाडूमातीसाठी मूर्तिकारांना मिळणार अनुदान; गणेशोत्सवात होणार फायदा

Ratnagiri : शाडुच्या मातीसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील मूर्तीकारांसाठी अनुदान देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला आहे. अनुदान देण्याचा निर्णय घेणारा रत्नागिरी जिल्हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे

अमोल कलये

रत्नागिरी : मूर्ती घडविताना प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असतो. प्रामुख्याने गणेशोत्सवात गणेश मूर्ती घडविताना पीओपीच्याच मूर्ती घडविल्या जातात. शाडू मातीच्या मूर्ती घडवून त्या तुलनेत महाग पडत असतात. यामुळे मुर्तीकाराना शाडूमातीसाठी अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे मूर्तिकारांना गणेशोत्सवात फायदा होणार आहे. 

शाडुच्या मातीसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील मूर्तीकारांसाठी अनुदान देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला आहे. अशा प्रकारे अनुदान देण्याचा निर्णय घेणारा रत्नागिरी जिल्हा हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे. दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातील मूर्तीकार संघटनेकडून आमदार किरण सामंत यांच्याकडे शाडु मूर्तीसाठी अनुदान मिळावे अशी मागणी केली होती. याचा विचार करत मुर्तीकाराने प्रोत्साहन देण्याच्या अनुषंगाने पाठपुरावा केला. 

जिल्हाधिकाऱ्यांकडून शिक्कामोर्तब 

दरम्यान आमदार किरण सामंत यांनी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी यांना फोन करून रत्न - सिंधु योजनेतून शाडुच्या मूर्तीसाठी अनुदान देण्याच्या सुचना केल्या. याबाबत जिल्हाधिकारी यांनी देखील याबाबत तात्काळ निर्णय घेऊन रत्नागिरी जिल्ह्यातील मूर्तिकारांसाठी शाडूमातीकरिता अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. 

७५० मूर्तिकारांना होणार फायदा 

सदरचा निर्णय हा तात्काळ लागू होणार असून जिल्ह्यातील जवळपास ७५० मूर्तीकारांना याचा फायदा होणार आहे. मुख्य बाब म्हणजे कोकणातील गणेशोत्सव दरम्यान या निर्णयाचा मोठा फायदा मूर्तिकारांना होणार आहे. प्लॅस्टिक ऑफ पॅरिसची मूर्ती, पर्यावरणावर होणारा परिणाम यांच्या चर्चा होत असताना किरण सामंत यांनी हे घेतलेला निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पनवेलमध्ये ऑनलाईन सट्टेबाजी रॅकेटवर पोलिसांचा छापा

मोठी दुर्घटना! पाच मजली इमारत कोसळली; सिमेंटच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण दबल्याची भीती

अजित पवार गटाच्या नेत्याकडून महिलेचा विनयभंग; विधवेकडे नगरसेवकानं केली शरीरसुखाची मागणी

सासूसाठी सुनबाई बिबट्याशी भिडली, संकटात नातूनेही दाखवलं धाडस

IAS Officers Suspended: ठेकेदारांच्या पैशातून यूरोप-ऑस्ट्रेलियाचा दौरा; दोन IAS अधिकारी सस्पेंड, प्रशासकीय विभागात खळबळ

SCROLL FOR NEXT