Ratnagiri Mumbai Goa highway accident latest news  साम टीव्ही
महाराष्ट्र

रत्नागिरीत थरारक अपघात! पोलीस गाडीला चिरडत २२ चाकांचा महाकाय कंटेनर दरीत; एका अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू

ASI Santosh Gaikwad dies : रत्नागिरीतील अंजनारी पुलाजवळ मुंबई-गोवा महामार्गावर २२ चाकांच्या कंटेनरने वाहतूक पोलिसांच्या गाडीला धडक दिली. या अपघातात एएसआय संतोष गायकवाड यांचा मृत्यू झाला.

Namdeo Kumbhar

अमोल कलये, रत्नागिरी प्रतिनिधी

Ratnagiri Mumbai Goa highway accident latest news : मुंबई-गोवा महामार्गाचे रुंदीकरण आणि चौपदरीकरण झाल्यानंतरही या मार्गावरील भीषण अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. महामार्गावर बेजबाबदारपणे धावणाऱ्या मालवाहू गाड्यांमुळे काल शनिवारी रात्री उशिरा अंजनारी पुलाजवळ असाच एक काळीज पिळवटून टाकणारा अपघात घडला. लोखंडी सळई वाहून नेणाऱ्या एका महाकाय कंटेनरने वाहतूक पोलिसांच्या वाहनाला मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात हातखंबा वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) संतोष आप्पासाहेब गायकवाड (वय ५१) आणि कंटेनर चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

नेमकं काय घडलं?

शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास अंजनारी पूल परिसरात हातखंबा पोलीस वाहतूक शाखेचे शासकीय वाहन (क्र. MH 08 BE 3561) गस्तीवर असताना, मागून येणाऱ्या लोखंडी सळईंनी भरलेल्या कंटेनरने (क्र. RJ 09 GE 2397) पोलीस गाडीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, पोलिसांचे वाहन थेट अंजनारी नदीच्या खोल उतारावर जाऊन पलटी झाले. तर धडक दिल्यानंतर नियंत्रण सुटलेला कंटेनरही रस्त्याच्या कडेला पलटी झाला.

दोन पोलिसांसह चालक गंभीर; उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली

या अपघातात पोलीस गाडीतील दोन पोलीस अंमलदार आणि एक सहाय्यक फौजदार जबर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी आणि पोलिसांनी तातडीने बचावकार्य राबवून जखमींना उपचारासाठी रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) संतोष गायकवाड यांची प्राणज्योत मालवली. तसेच, पोलीस कॉन्स्टेबल अनिल शिंगाडे हे या अपघातात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दुसरीकडे, अपघात घडल्यानंतर कंटेनरच्या केबिनखाली चिरडल्या गेल्यामुळे कंटेनर चालकाचाही जागीच मृत्यू झाला. मृत कंटेनर चालकाची ओळख पटवण्याचे काम सध्या पोलीस करत आहेत.

रक्षणकर्त्यावरच काळाचा घाला; परिसरात हळहळ

महामार्गावर वाहतुकीचे नियमन करणारे आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या खाकी वर्दीतील अधिकाऱ्याचाच अशा अपघातात मृत्यू झाल्याने पोलीस दलासह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. बेजबाबदार आणि भरधाव वेगाने चालवल्या जाणाऱ्या अवजड वाहनांमुळे महामार्गावर रोज निष्पाप नागरिकांचे जीव जात असल्याने स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fridge Cleaning Tips: दिवाळीआधी घरातील फ्रिज कसा स्वच्छ करायचा? सोप्या 5 टिप्स जाणून घ्या

Maharashtra News Live Update: Mumbai: नरभक्षक बिबट्याचा महिलेवर हल्ला; हल्ल्यात महिलेचा बळी

विद्यार्थ्यांसाठी १२८ दिवसांच्या सुट्ट्यांचे नियोजन जाहीर; 16 दिवसांची दिवाळीची सुट्टी; 24 नोव्हेंबरला ही सुट्टी

Monday Horoscope: ६ राशींच्या व्यक्तींना अचानक होणार धनलाभ; वाचा उद्याचे राशीभविष्य

Health Tips : जेवण करताना वारंवार जीभ दातात का अडकते? जाणून घ्या कारणे आणि आरोग्य टिप्स

SCROLL FOR NEXT