eknath shinde vs uddhav thackeray  Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : ऐन निवडणुकीत शिंदे गटाला मोठा धक्का; कोकणातील शेकडो पदाधिकाऱ्यांचा ठाकरे गटात प्रवेश

Maharashtra Political news : ऐन निवडणुकीत शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. कोकणातील शेकडो पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे.

Vishal Gangurde

शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला

आमदार भास्कर जाधव आणि जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

ऐन निवडणुकीत शिंदे गटाला धक्का

या घडामोडीमुळे स्थानिक निवडणुकीतील राजकीय समीकरणात बदल

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. निवडणूक आयोगाकडून नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राजकीय पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते एका पक्षातून दुसर्‍या पक्षात जात आहे. रत्नागिरीच्या गुहागरमधून शिंदे गटाच्या शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. यामुळे ऐन निवडणुकीत एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे.

रत्नागिरीमधील गुहागर विधानसभा मदारसंघातील धामणदेवी जिल्हा परिषद गटातील आंजणी ढाकरवाडीतील शिंदे गटाच्या सर्व प्रमुख पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. त्यांनी शिवेसना नेते,आमदार भास्कर जाधव, जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला.

कुणी केला ठाकरे गटात प्रवेश?

आंजनी ढाकरवाडी येथील प्रभाकर गोपाळ मनवळ, सुनंदा विठ्ठल मनवळ, सुप्रिया सुनील दिवाळे, पुष्पा अनंत दळवी, अनिल गोपाळ मनवळ, वसंत विठ्ठल रामाणे, संजय अनंत गुरव,सायली हरेश रामाणे, रघुनाथ काशीराम माळी, विठ्ठल तुकाराम मनवळ, हरिश्चंद्र धोंडू दिवाळे, यशवंत अनंत पवार, अनिल पवार, गणेश रामचंद्र वीर, राजाराम रामचंद्र भुवड

निवास लक्ष्मण पवार, हरिश्चंद्र वीर, राजाराम पवार, , सुरेश रेमजे, प्रभाकर कृष्णा वीर, अक्षदा अनिल मनवळ, विनायक शंकर पवार, सिताराम लक्ष्मण मांडवकर, संतोष पवार, प्रतीक मनवळ, अनंत दगडू दळवी, यशवंत सखाराम रेमजे, वसंत वीर, संजय दत्ताराम रेमजे,विश्वनाथ धोंडू दळवी, मृणाल महेंद्र दळवी, सार्थक संतोष पवार यांच्यासह शेकडो ग्रामस्थांनी ठाकरे गटात प्रवेश केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्याच्या भेटी होईना; अडचणी कोणी विचारेना, कार्यकर्त्यांना भासतेय अजितदादांची कमी

धुळे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात! ट्रॅव्हल्स बस पलटी, 6 प्रवासी जखमी

कार चालवताना अचानक उघडली 'एअर बॅग', एअर बॅगमुळे 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

स्मार्ट मीटरचा झटका, ग्राहकांना लाखाचा फटका, सोलरधारकांना 20 पटीनं वीजबिल, महावितरणचं स्मार्ट मीटर की स्मार्ट लूट?

NEET नंतर TET चा पेपरही फुटला, 28 जूनची TET परिक्षा रद्द, भिवंडीतील पेपरफुटीचं हरियाणा-बिहार कनेक्शन

SCROLL FOR NEXT