Locals and rescue teams at Guhagar beach in Ratnagiri after a drowning incident involving a family from Mumbai. 
महाराष्ट्र

Ratnagiri: गुहागरमधील समुद्रात पोहताना एकाच कुटुंबातील तीनजण बुडाले, एकाचा मृत्यू

Ratnagiri Beach : रत्नागिरीतील गुहागर समुद्रकिनाऱ्यावर मुंबईतील एका कुटुंबातील तीनजण बुलडाली. यात एकाचा मृत्यू झाला, तर दोघांना स्थानिकांनी वाचवले आहे.

Bharat Jadhav

  • रत्नागिरीच्या गुहागर समुद्रात पोहताना मोठी दुर्घटना

  • मुंबईतील कुटुंबातील तिघे पाण्यात बुडाले

  • एका पुरुषाचा मृत्यू, महिला आणि १४ वर्षांचा मुलगा वाचले

अमोल कलये, साम प्रतिनिधी

रत्नागिरी गुहागरमध्ये समुद्रकिनारी पर्यटनासाठी आलेल्या एका कुटुंबातील तीनजण पाण्यात बुडालेत. समुद्रात पोहताना हे तिघेही बुडाले असून यात एकाच मृत्यू झालाय. तर दोन जणांना वाचवण्यात यश आले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, समुद्रात बुडालेले कुटुंब मुंबईतील पवई येथील रहिवाशी आहेत. पाण्याचा अंदाज न आल्याने हे तिघेही पाण्यात बुडाले होते. यात एका महिलेला आणि १४ वर्षाच्या मुलाला स्थानिकांनी वाचवले. मात्र पुरुषाला वाचवण्यात यश आले नाही.

प्रत्यक्षदर्शी अक्षय पवार यांनी घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, दोन दिवसांपासून समुद्रकिनारी पर्यटक मोठ्या प्रमाणात आले होते. त्यावेळी समुद्रात पोहताना तिघेजण बुडाले, त्यात एकाचा मृ्त्यू झालाय. प्रत्यक्षदर्शी अक्षय पवार हा समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारण्यासाठी आला होता. त्यावेळी त्याला तीन जण समुद्रात बुडाताना दिसले. सुरुवातील ते पोहत आहेत, हे दिसत होते.

परंतु ते किनाऱ्यापासून ५० ते ६० दूर समुद्रात होते. त्यानंतर जीवरक्षक दलाला पाचरण केलं. दरम्यान पाण्यात बुडणारे तिघेही एकाच कुटुंबातील होते. आई-वडील, मुलगा हे तिघेही पाण्यात बुडत होते. यात आई आणि १४ वर्षीय मुलाला वाचवण्यात आले. मात्र वडील ४२ वर्षीय अमोल मुथ्या यांचा मृत्यू झाला. हे तिघे पाण्यात बुडत असताना मदतीसाठी बोलवण्यातील आली ती मदत लगेच पोहोचली. परंतु अमोल मुथ्या यांचा पाण्यात असतानाच हृदयाचे ठोके बंद पडली होती. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला असावा. आता त्यांच्या मृतदेहाला गुहगरमधील रुग्णालयात नेण्यात आले आहे.

ख्रिसमस सणाला लागू आलेल्या शनिवार-रविवारच्या सुट्टीमुळे राज्यातील अनेक पर्यटन ठिकाणी पर्यटकांनी तोबा गर्दी केली आहे. देवस्थानासह समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. मात्र याचदरम्यान काही अनुचित प्रकार घडत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope: सूख-समृद्धी येण्याचा योग; 'या' तीन राशींची होणार आर्थिक भरभराट, जाणून घ्या आजचं राशीभविष्य

Car-Truck Accident: SUV कार आणि ट्रकचा भीषण अपघात; धडकेत कारचा चक्काचूर,६ जणांचा जागीच मृत्यू

सर्वात मोठी बातमी! राज्याच्या राजकारणात खळबळ, अखेर दोन्ही शिवसेना एकत्र

Congress: काँग्रेसला सर्वात मोठा धक्का; माजी मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर ७५ नेत्यांनी सोडली 'पंजा'ची साथ, राजकारणात खळबळ

काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी; स्वर्ग पांढऱ्या चादरीखाली, पर्यटनाला बहर

SCROLL FOR NEXT