rat in tuljabhavani mandir tuljapur saam tv
महाराष्ट्र

Tulja Bhavani Mandir : पुजारी वैतागले; तुळजाभवानी मंदिरात उंदारांचा उच्छाद, पेढ्यांसह लाडवावर ताव

दरम्यान देवीच्या मंदिरात उंदीर फिरत असल्याचा व्हिडिओ देखील व्हायरल हाेत आहे.

Siddharth Latkar

- बालाजी सुरवसे

Shri Tuljabhavani Temple News : तुळजापूरातील श्री तुळजाभवानी मंदिरात उंदरांनी धुमाकूळ घातला आहे. भाविकांकडून मिळणारे प्रसादरुपी पेढे, साखर, लाडु अन्य गोड पदार्थांवर उंदीरमामा ताव मारत आहेत. या प्रकारामुळे मंदिर व्यवस्थापनाने तातडीने उपाययाेजना राबविण्यासाठी ठाेस पावले उचचली आहेत. (Maharashtra News)

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरात (tuljabhavani mandir) उंदरांचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. देवीच्या मूख्य गाभाऱ्यात देखील मोठ्या प्रमाणावर उंदराचा वावर पाहायला मिळत आहे. दरम्यान देवीच्या मंदीरात उंदीर फिरत असल्याचा व्हिडिओ देखील व्हायरल हाेत आहे.

या प्रकारामुळे मंदिर संस्थानच्या वतीने उपाययोजना सुरु करण्यात आली आहे. उंदीर पकडण्यासाठी गाभाऱ्यात पिंजरा लावण्यात आला आहे. या उंदराचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती मंदीर प्रशासनाने दिली आहे.

दरम्यान मंदिरात 24 तास नंदादीप तेवत असतो तसेच सिसिटिव्हीसह दिवे सुरु असतात त्यामुळे उंदराच्या कुरतडण्याने शार्ट सर्कीटसह अन्य प्रकार घडु नये यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी पुजारी वर्गातून केली जात आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

SCROLL FOR NEXT