bhiwandi wada manor highway, rasta roko of citizens saam tv
महाराष्ट्र

Bhiwandi Wada Manor Highway : खड्डे बुजवा, लाेकांचा जीव वाचवा; भिवंडी- वाडा- मनोर महामार्गावर ग्रामस्थांचा रास्ता रोको

Potholes Issue : शेकडाे ग्रामस्थ आज खड्डे बुजवा या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेत.

Siddharth Latkar

- फय्याज शेख

Potholes Issue : रस्त्यावरील खड्ड्यांनी त्रस्त झाले ग्रामस्थांनी आज (गुरुवार) भिवंडी - वाडा - मनोर महामार्गावर रास्ता रोको आंदाेलन छेडले. या आंदाेलनामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. दरम्यान रस्ता चांगला करणार असे आश्वासन मिळाल्याशिवाय आंदाेलन मागे घेणार नसल्याची भूमिका आंदाेलकांनी घेतली आहे. (Maharashtra News)

भिवंडी - वाडा - मनोर महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालक व ग्रामस्थांना अनेक समस्यांना समोर जावे लागत आहे. या महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे असंख्य अपघात झाले आहेत. काहींना आपला जीव गमवावा लागला आहे. (potholes issue Bhiwandi Wada Manor Highway)

हा रस्ता दुरुस्त केला जात नसल्याने स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. आज पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील भिवंडी- वाडा- मनोर महामार्ग कुडूस नाक्यावर स्वाभिमानी संघटनेच्या नेतृत्वाखालील स्थानिक ग्रामस्थांनी रास्ता रोको केला.

या महामार्गावर पडले‌ले खड्डे त्वरित भरावे या मागणीसाठी आज हा रास्ता रोको करण्यात आला. या आंदाेलनात शेकडाे ग्रामस्थ सहभागी झाले हाेते.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Top 10 Diamonds: जगातले सर्वात मोठे TOP 10 हिरे कोणते? तुम्हाला ही माहितीये का?

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये काही पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या रांगा

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

SCROLL FOR NEXT