rasta roko andolan by sangam mahuli villagers at satara pandharpur road saam tv
महाराष्ट्र

Satara Rasta Roko : सातारा पंढरपूर रस्त्यावर संगम माहूली ग्रामस्थांचा रास्ता राेकाे, वाहतुक खाेळंबली

या रास्ता राेकाेमुळे सातारा पंढरपूर रस्त्यावरील वाहतुकीचा खाेळंबा झाला.

ओंकार कदम

Satara News :

सातारा पंढरपूर रस्त्यावरील सातारा शहरालगत असणाऱ्या संगम माहूली येथे निकृष्ट रस्त्याच्या निषेधार्थ आज (मंगळवार) ग्रामस्थांनी एकत्र येत सातारा पंढरपूर लातूर राज्य महामार्गावर रास्ता रोको (satara pandharpur rasta roko andolan) आंदाेलन छेडले आहे. यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. (Maharashtra News)

सातारा शहरापासून संगम माऊली पर्यंत बनवलेल्या पट्ट्यात बनवलेला रस्ता निकृष्ट दर्जाचा आहे. या ठिकाणी 22 हून अधिक लोकांचा मागील काही वर्षात मृत्यू झाला आहे. याबाबत वारंवार प्रशासनास निवेदन देऊन देखील प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा ग्रामस्थांचा आराेप आहे.

हा रस्ता लवकरात लवकर व्हावा, त्याच्या दूरावस्थेकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज संगम माहुली येथे पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी एकत्र येत रास्ता रोको आंदाेलन केले. तसेच अपघातांच्या घटनेला संबंधित ठेकेदार आणि कंपनी आहे. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Daily Wear Mangalsutra: डेली वेअरसाठी छोटे, नाजूक मंगळसूत्र, हे आहेत ट्रेडिंग 5 पॅटर्न

कुत्र्यासोबत अनैसर्गिक कृत्य; विकृत घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

बीडमध्ये पुन्हा खळबळ; लॉजमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू

लोकलच्या डब्याला लागली आग; प्रवाशांची उडाली धावपळ, VIDEO

PAK vs NZ: सुपर-8 च्या पहिल्याच सामन्यात पावसाची फटकेबाजी; सामना रद्द, कोणत्या संघाच्या स्वप्नावर फेरलं पाणी?

SCROLL FOR NEXT