Pratap Sarnaik orders strict verification of Rapido Ola Uber drivers saam tv
महाराष्ट्र

मुंबईतील ATS च्या कारवाईनंतर सरकार अलर्ट; रॅपिडो, ओला, उबरबाबत मोठा निर्णय

Rapido, Ola and Uber Drivers Under Scrutiny: रॅपिडो, ओला आणि उबर चालकांची काटेकोर तपासणी करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई आणि गरज पडल्यास स्वतंत्र सुधारित कायद्याचा विचार होणार.

Omkar Sonawane

रॅपिडो, ओला आणि उबर यांसारख्या अपआधारित प्रवासी वाहतूक सेवांच्या चालकांविरोधात विविध प्रकारच्या तक्रारी प्राप्त होत आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित चालकांची काटेकोर तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करा, तसेच आवश्यकतेनुसार गुन्हे दाखल करा, असे स्पष्ट निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोटार विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत. मुंबईतील माहिम परिसरात रॅपिडो बाइक टॅक्सी चालवणाऱ्या एका व्यक्तीविरोधात दहशतवादविरोधी पथकाने (ATS) केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत ॲपआधारित प्रवासी वाहतूक सेवांशी संबंधित चालकांची तपासणी आणि नियमांचे पालन याबाबत चर्चा करण्यात आली.

रॅपिडो, ओला आणि उबरसारख्या सेवांद्वारे प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकांच्या कामकाजावर लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे या पार्श्वभूमीवर अधोरेखित झाले आहे. चालकांविरोधात प्राप्त होणाऱ्या तक्रारींची गंभीर दखल घेऊन त्यांची पडताळणी करावी आणि नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देश सरनाईक यांनी दिले.

पुणे जिल्ह्यात रॅपिडो बाइक टॅक्सीचा वापर करू नये; प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे नागरिकांना आवाहन

कंपनीने पुणे जिल्ह्यात बाइक टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक ॲग्रीगेटर परवाना प्राप्त केलेला नसल्याचे निदर्शनास आले आहे. परवान्याविना बाइक टॅक्सी सेवा सुरू ठेवल्याप्रकरणी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांच्यामार्फत संबंधित कंपनीविरुद्ध १६ ऑक्टोबर २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पुणे शहर व जिल्ह्यातील नागरिकांनी रॅपिडो बाइक टॅक्सी सेवेसाठी असलेल्या भ्रमणध्वनीवरील अनुप्रयोगाचा वापर करू नये, असे आवाहन पुणे व पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

रॅपिडो कंपनीने बाइक टॅक्सी सेवेसाठी पुणे जिल्ह्याकरिता आवश्यक एकत्रीकारक परवाना घेतलेला नसतानाही पुणे शहरात व्यवसाय सुरू ठेवल्याचे निदर्शनास आले होते. या पार्श्वभूमीवर ९ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्हाधिकारी तथा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीला प्राधिकरणाचे सदस्य, अन्य कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच स्वयंचलित रिक्षा व विद्युत दुचाकी टॅक्सी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांना पुण्यात न्याय मिळेना; थेट मंत्रालयात धडक! सर्व कागदपत्रे तपासून पोलीस संरक्षणात कंपाऊंड पूर्ववत करण्याचे निर्देश

पुणे शिक्षक मतदारसंघाचा विजयाचा कोटा ठरला; सानप, गावडे की आसगावकर, सध्या कोण आघाडीवर, कोण पिछाडीवर?

विधानसभा निवडणुकांआधी आयोगाचा मोठा निर्णय; पाच राज्यांमधील अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Black Rice Benefits: पांढरे तांदूळ सोडून लोक का खाताहेत काळा तांदूळ, फायदे वाचून थक्क व्हाल

Kadboli Recipe : दिवाळीत चकली-चिवडा कशाला! यंदा बनवा कुरकुरीत कडबोळी, एकदा खाल तर हात थांबणारच नाही

SCROLL FOR NEXT