Raosaheb Danve News, maharashtra politics, Eknath Shinde News saam tv
महाराष्ट्र

राज्याच्या राजकारणात नवीन काही तरी घडणार; रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याचा अर्थ काय?

आज (मंगळवार) सकाळपासून राज्यातील राजकीय घडामाेडींना वेग आला आहे.

लक्ष्मण सोळुंके

जालना : विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर (maharashtra vidhan parishad election result) आज (मंगळवार) सकाळपासून महाराष्ट्रातील राजकारणात (maharashtra politics) विशेषत: शिवसेनेत काही घडामाेडी घडल्या आहेत. शिवसेनेच्या (shivsena) काही आमदारांचे फाेन लागत नसल्याने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सेनेचे (Shiv Sena latest News Updates) आमदार व मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सुमारे 17 आमदारांचे माेबाईल फाेन नाॅटरिचेबल (Eknath Shinde not reachable) झाल्याने राज्यात राजकीय भुंकप घडणार अशी चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान आज भाजपचे नेते केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे (raosaheb danve) यांनी महाविकास आघाडी सरकार (mva) विरोधात जनतेचे नाराजी आहेच मात्र घटक पक्षांची देखील असल्याचे चित्र सर्वांसमाेर आले आहे. आगामी काळात नवीन काही तरी पहायला मिळेल असे सूताेवाच दानवेंनी केले. (Raosaheb Danve latest Marathi news)

रावसाहेब दानवे म्हणाले राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आघाडी सरकारने जो आरोप केला की अपक्षांची मते फुटली. मात्र विधान परिषद निवडणुकीत मात्र आघाडीतील पक्षाच्या आमदारांची मत फुटली आणि आमचा पाचवा उमेदवार निवडून आला आहे. त्यामुळे या सरकार विरोधात जनता नाराजी आहे हे स्पष्ट झाले आहे. (Eknath Shinde News)

राज्यातील राजकारणात (maharashtra politics) नवीन काही तरी घडणार असल्याचे वक्तव्य केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केले. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्यासह आमदार गायब असल्याने आत्ता एकनाथ शिंदे कुठं असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच मराठवाड्यातील (marathwada) सहा आमदार गायब असल्याने सरकार पडणार का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: रत्नागिरीत अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या

Madhuri Dixit: धकधक गर्लचं लाजवाब सौंदर्य, फोटो पाहताच घायाळ व्हाल

Sonu Nigam : 'ये दिल दीवाना...' रस्त्यावर थांबून छोट्या चाहत्यासोबत सोनू निगमनं गायलं गाणं, पाहा VIDEO

आता देशात एकसमान मानकांद्वारे घेण्यात येणार मातांची काळजी, NABH कडून नवीन आरोग्य मानकांचा समावेश

Maharashtra Election 2024 : कांदा महागला, महायुतीला फायदा होणार? जाणून घ्या बांग्लादेश अन् इराणसोबत कनेक्शन

SCROLL FOR NEXT