raosaheb danve, jalna, maharashtra government, bjp saam tv
महाराष्ट्र

तुम्हांला संधी हवी असल्यास विचार करु; केंद्रीय मंत्र्याचा राष्ट्रवादीच्या नेत्यास चिमटा

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि राज्याचे आराेग्य मंत्री राजेश टाेपे हे जालन्यातील कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर हाेते.

लक्ष्मण सोळुंके

जालना : जालना (jalna) जिल्ह्यात जे कामं करायचे असेल ते लवकर करून टाका आता राज्य सरकारचे (maharashtra government) थोडेच दिवस उरले असून मी फक्त दाेन ते तीन दिवस विरोधी पक्षात आहे अशी टिप्पणी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (raosaheb danve) यांनी आराेग्य मंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांना उद्देशून त्यांच्या समोरच केली. दरम्यान अजून संधी हवी असेल तर विचार करता येईल असे म्हणत दानवे यांनी भविष्यात राज्यात सत्ता स्थापनेचे संकेत दिले. (raosaheb danve latest marathi news)

जालन्यात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय आणि अन्न आणि औषधी प्रशासन विभागाच्या कार्यालयाचे भूमिपूजन आज (रविवार) केंद्रीय मंत्री दानवे आणि आराेग्य मंत्री टोपे यांच्या उपस्थितीत झाले. त्यावेळी आयाेजिलेल्या कार्यक्रमात दानवे बोलत होते.

दानवे म्हणाले या जिल्ह्यातील प्रत्येक खात्यांवर आपले लक्ष हवे. जिल्हाधिकारी कार्यालय असाे, कृषी कार्यालय असाे अथवा अन्य काेणतेही आपण (दाेघे) जबाबदारीने त्यावर लक्ष ठेवून त्यांचा कारभार जिल्ह्याच्या विकासासाठी हाेत आहे की नाही हे पाहणे गरजेचे आहे. तुम्ही राज्यात मंत्री आहात. मी केंद्रात आहे. दाेघे मिळून जिल्ह्याचा विकास साधू असेही दानवेंनी नमूद केले.

दरम्यान 14 वर्षात तुम्ही जे काही केेले आणि जे करण्याचे राहिले आहे. ते करुन घ्या. मी दाेन ते दिवसच विराेधी पक्षात आहे. त्यानंतर तुम्ही देखील विचार करु शकता असा टाेलाही दानवेंनी टाेपेंना सध्या सुरु असलेल्या महाराष्ट्रातील राजकीय घडामाेडींवर मारला.

दरम्यान राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता दानवे यांनी फेटाळून लावली. तसेच शिंदे गटाशी युती करायची की नाही याबाबत भाजपचे राज्यातील नेते निर्णय घेतील असंही दानवे यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची गुजरातमध्ये कोणतीही भेट झाली नाही असंही दानवे यांनी नमूद केले. ते म्हणाले आमच्या पक्षाच्या बैठका जरी सुरू असल्या तरी राज्यातील परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेऊन आहोत. राष्ट्रवादी (NCP) कायदेशीर लढाई त्यांच्या पद्धतीने लढणार असेल तर हा त्यांचा प्रश्न आहे असंही दानवे यांनी स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Delhi Police : प्रसिद्ध कलाकाराच्या हत्येचं षडयंत्र; रोहित गोदारा-गोल्डी बरार गँगच्या २ शुटरला राजधानीतून अटक

Dasara Melava: पाच वर्षाचा बाळ शिवसैनिक शिवतीर्थावर निष्ठा आणि उत्साहाची झळक दाखवतोय|VIDEO

Maharashtra Dasara Melava Live Update: उद्धव ठाकरे दसरा मेळाव्याला पोहोचले

IND vs WI Day-1 Highlights: आधी सिराज अन् बुमराहनं कंबरडं मोडलं, नंतर राहुलनं कुटलं; वेस्ट इंडीजविरुद्ध पहिल्या दिवशी भारताचं पारडं जड

Paneer Curry Recipe : सणासुदीला खास बनवा पनीर करी, चव हॉटेलपेक्षा भारी

SCROLL FOR NEXT