Raosaheb Danve, Eknath Shinde News, Shiv Sena News, latest Politics News Saam Tv
महाराष्ट्र

Raosaheb Danve : छत्रपती शिवरायांचा एकेरी भाषेत उल्लेख; टीकेची झोड उठल्यानंतर दानवेंनी मागितली माफी

गेल्या काही दिवसांपासून भाजपमधील नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त विधानं केली जात आहे.

लक्ष्मण सोळुंके

जालना : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत समर्थ रामदास स्वामी हेच शिवरायांचे गुरू होते, असं विधान दानवे करताना दिसून येत आहे. इतकंच नाही, तर दानवे (Raosaheb Danve) यांनी शिवरायांचा एकेरी भाषेत उल्लेख देखील केल्याचं व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. त्यांच्या या कृतीनंतर शिवप्रेमींमधून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, वादग्रस्त विधानानंतर रावसाहेब दानवे यांनी व्हिडीओ शेअर करत माफी मागितली आहे.

गेल्या काही दिवसांपासून भाजपमधील नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त विधानं केली जात आहे. सुरूवातीला राज्यपाल कोश्यारी, नंतर मंगलप्रभात लोढा, त्यानंतर प्रसाद लाड आणि आता थेट केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटलं असून शिवप्रेमींमधून संताप व्यक्त केला जात आहे. (Maharashtra Politics News)

काय म्हणाले रावसाहेब दानवे?

रावसाहेब दानवे यांनी व्हायरल झालेल्या व्हिडीओ क्लिपवर खुलासा केला आहे. गेल्या वर्षभरात किंवा दोन वर्षात आपण असले कुठल्याच प्रकारचे विधान केले नसल्याचं दानवे यांनी म्हटलं आहे. दोन वर्षांपूर्वी नाशिक दौऱ्यावर असताना राज्यपाल यांच्या विषयी पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता, अनवधानाने माझ्या तोंडातून महाराजांबद्दल एकेरी भाषेचा उल्लेख झाला होता, त्यावेळी मी देशातील जनतेची माफी मागितली होती, आज पुन्हा जनतेची माफी मागतो, असं म्हणत दानवेंनी जनतेची माफी मागितली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: संघाच्या शताब्दी कार्यक्रमात पंतप्रधान मोदींच्या हस्ते टपाल तिकीट आणि नाणं जारी

Kolhapur Tragedy : अग्निशमन दलाच्या नव्या इमारतीचा स्लॅब कोसळला, एकाचा मृत्यू तर सहा जखमी

Shocking: पोटच्या गोळ्याचे भयानक कृत्य, दारूच्या नशेत आईची हत्या, बापालाही बेदम मारलं

Chochlate Smoothie Recipe: फायदेशीर आणि स्वादिष्ट चॉकलेट मखाना स्मूदी, वजन कमी करण्यासाठी परफेक्ट, वाचा सोपी रेसिपी

Dussehra 2025: नवरात्रीत उगवलेल्या जवपासून करा दसऱ्याची पूजा, शुभ मुहूर्त आणि पूजा पद्धत जाणून घ्या

SCROLL FOR NEXT