Raosaheb Danve Saam Tv
महाराष्ट्र

महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांची अवस्था तिरुपतीमधील न्हाव्यांसारखी - रावसाहेब दानवे

राज्यात भाजपचं सरकार आणखी 5 वर्ष हवं होतं. मात्र राज्यात भाजपचं सरकार नाही याची खंत सर्वांना आहे असं केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.

लक्ष्मण सोळुंके

जालना - राज्यात भाजपचं सरकार आणखी 5 वर्ष हवं होतं. मात्र राज्यात भाजपचं सरकार नाही याची खंत सर्वांना आहे असं केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी म्हटलं आहे. जालन्यात (Jalna) महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अँग्रीकल्चरच्या वतीने 'केंद्रीय अर्थसंकल्प-महाराष्ट्राच्या व्यापार, उद्योग, कृषी क्षेत्रासाठी नेमकं काय मिळणार' या विषयावर चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. या चर्चासत्रात ते बोलत होते.

तीन वर्षांत महाविकास आघाडी सरकारने काहीच कामं केली नसून फक्त काही लाखांच्या निधीवरच रस्त्यांची बोळवण सुरू असल्याच सांगत दानवे यांनी महाविकास आघाडी सरकारमधील तिन्हीही पक्षांची तुलना तिरुपती बालाजी येथील न्हाव्यांशी केली आहे. तिरुपती बालाजी येथील न्हावी त्यांच्याकडे आलेल्या ग्राहकाच्या डोक्यावरील केस एकदाच न काढता सुरुवातीला दोन दोन वस्तारे हाणून त्यांना बसून ठेवतात. तर त्यांच्या डोक्यावर राहिलेले अर्धे केस दिवस वळल्यानंतर काढतात.

हे देखील पहा -

आपल्याकडे जास्तीत जास्त ग्राहक खेचण्यासाठी ते असं करत असतात असं बेताल वक्तव्य करत त्यांनी महाविकास आघाडी सरकार मधील तिन्हीही पक्षांची अवस्था तिरुपती मधील न्हाव्यांसारखी झाली असून लोक पक्षांपासून तुटू नये म्हणून हे तिन्हीही पक्ष दोन दोन वस्तारे हाणून विकासकामांना तुटपुंजा निधी देत असल्याचा टोला दानवे यांनी लगावला आहे. पण 2024 नंतर काही करता आलं तर बघू असंही ते या वेळी बोलताना म्हणाले.

जालना ते जळगाव रेल्वे मार्गाच्या अंतिम सर्वेक्षणाच्या कामाच्या निविदा प्रसिद्धा झाल्या आहेत. या रेल्वेमार्गाचं सहा महिन्यात सर्वेक्षण पूर्ण होईल होऊन या रेल्वे मार्गाचं उद्घाटन करणार असल्याचंही दानवे यांनी म्हटलं आहे. शिवाय मराठवाड्यातील नांदेड ते मनमाड या रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाच्या कामाचा शुभारंभ येत्या 12 मार्च रोजी करणार असल्याच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

Health Tips: दुप्पट वेगाने कमी होईल वजन; आहारात फक्त या एका गोष्टीचा करा समावेश, ३२ वरून २८ होईल कंबर

LPG Subsidy Rule: 1 ऑक्टोबरपासून 'या' ग्राहकांना मिळणार नाही सब्सिडी; आधारचं हे काम केलं नसेल तर सब्सिडी मिळणार नाही

Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक आणि धनु राशींना मिळणार नवी संधी; जाणून घ्या आठवड्याचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT