Ranjit Deshmukh  Ranjit Deshmukh
महाराष्ट्र

Maharashtra Politics: "घोडेबाजार" बोलून घोड्यांना बदनाम करू नका; राजकारणातील आयाराम गयारामवर रणजित देशमुखांचं वक्तव्य

Ranjit Deshmukh : संगमनेर तालुक्यातील देवगड येथे घोड्यांच्या नृत्य स्पर्धा पार पडलल्या.याचा धागा पकडत रणजीत देशमुख यांनी सध्याच्या राजकारणावर भाष्य केलं. मंत्री,नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जातात. त्याला राजकारणात घोडेबाजार म्हटलं जातं.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

(सचिन बनसोडे, अहमदनगर)

Horse dance competition Sangamner :

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात घोड्यांच्या नृत्य स्पर्धा पार पडली. महाराष्ट्रातील अनेक अश्वप्रेमींनी या स्पर्धेत आणि प्रदर्शनात भाग घेतला. अश्व अर्थात घोड्यांच्या प्रदर्शन आणि बाजाराचा धागा पकडत अश्वप्रेमी असोसिएशनचे अध्यक्ष तथा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे जावई रणजीत देशमुख यांनी सध्याच्या राजकारणावर भाष्य केलंय.(Latest News)

सध्याच्या राजकारणात माणसं आणि नेते विकली जाताय मात्र त्याला "घोडेबाजार" संबोधलं जातं. वास्तविक घोडा आपल्या मालकाप्रती प्रामाणिक असणारा प्राणी असून माणसं विक्रीला घोडेबाजार बोलून घोड्यांना बदनाम करू नका अशी विनंती देशमुख यांनी केलीय.

दरम्यान या स्पर्धेत महाराष्ट्रातील सर्वात उंच 'बिग जॅस्पर' घोडा या प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरला. संगमनेर तालुक्यातील देवगड येथे अश्वप्रेमी असोसिएशनच्या माध्यमातून गेल्या ८ वर्षापासून अश्वप्रदर्शन आणि बाजार भरवला जातो. यावर्षी देखील मोठा प्रतिसाद या प्रदर्शन आणि अश्व स्पर्धेला मिळाला. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, जुन्नरच्या विघ्नहर साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांनी प्रदर्शनाला भेट दिली.

या अश्वप्रदर्शनात घोड्यांचे नृत्य सगळ्यांचे आकर्षण ठरले. सकाळपासून या स्पर्धेला सुरूवात झाली आणि राज्यभरातून आलेल्या शेकडो अश्वप्रेमींनी यात सहभाग घेतलाय. आपल्या मालकाच्या इशाऱ्यावर अश्व अतीशय लयबद्ध नृत्य करतात. याचे परीक्षण करून विजेत्या अश्वांना मोठे बक्षीस देऊन सन्मान केला जातो. ही स्पर्धा बघण्यासाठी परिसरातील हजारो नागरिकांनी या ठिकाणी उपस्थिती लावली.

या अश्व प्रदर्शनात सर्वांचे आकर्षण ठरला तो ७० इंच उंचीचा 'बिग जॅस्पर' हा घोडा. हा घोडा महाराष्ट्रातील सर्वात उंच घोडा असून राज्यात प्रथमच तो एखाद्या प्रदर्शनात सहभागी झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP Leader: भाजप नेत्याला घेरत जीवघेणा हल्ला, भररस्त्यात संपवलं; आरोपी घटनास्थळावरुन फरार

Ind Vs Eng 2nd Test : दोन ओव्हर्स, दोन विकेट्स! आकाश दीपचा कहर, इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत

Loofah: प्लास्टिकचा लूफा वापरल्याने त्वचेवर काय परिणाम होतो?

Pune Crime : इंजिनीअरिंगमध्ये तीनवेळा नापास, नैराश्यात तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरुन थेट नदीत उडी

Maharashtra Politics: पहलगाममध्ये धर्म विचारून गोळ्या मारल्या, आणि ही लोक भाषा विचारून हिंदूंना चोपतायत- आशिष शेलार|VIDEO

SCROLL FOR NEXT