Rane Brothers’ Twitter spat sparks political heat in Mahayuti; spotlight back on internal power tussle. Saam TV News
महाराष्ट्र

Political: राणे बंधूंमध्ये शीतयुद्ध! नितेश राणेंकडून 'तो' व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीनशॉट व्हायरल, निलेश राणेंवर आरोप

Rane Brother Twitter War: राणे बंधूंमध्ये ट्वीटर युद्ध उफाळला आहे. नितेश राणे आणि निलेश राणे यांच्यातील वादामुळे महायुतीतील अंतर्गत तणाव पुन्हा समोर आला आहे.

Bhagyashree Kamble

गेल्या काही दिवसांपासून राणे बंधूंमध्ये शीतयुद्ध पाहायला मिळत आहे. भाजपाचे नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी धाराशिव येथील मेळाव्यात बोलताना, "देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच राहतील आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील" असे ठाम विधान केलं होते. "मुख्यमंत्रीपदावर बसलेला नेता भाजपचाच आहे," असेही त्यांनी म्हटले होते. या वक्तव्यानंतर शिवसेनेचे कुडाळचे आमदार निलेश राणे यांनी एक्सवर पोस्ट करत नितेश राणेंना सल्ला दिला. यानंतर आता पुन्हा एकदा राणे बंधूंमध्ये जूंपल्याचं पाहायला मिळत आहे. मंत्री नितेश राणे यांनी एक्सवर पोस्ट करत निलेश राणे यांना युती धर्माची आठवण करून दिली आहे.

मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांच्या गेल्या काही दिवसांपासून ट्वीटर वॉर पाहायला मिळत आहे. नुकतंच नितेश राणे यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. या पोस्टवरून त्यांनी निलेश राणे यांना युती धर्माची आठवण करून दिली आहे. नितेश राणे यांनी एका कार्यकर्त्याचा व्हॉट्सअॅप चॅटचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. यात त्यांनी महायुतीतील कार्यकर्त्यांना धमकावणे अयोग्य असल्याचं मत व्यक्त केलं.

मंत्री निलेश राणे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, "आदरणीय निलेशजी, आपणच काही दिवसाअगोदर महायुतीबद्दल बोलला होता. आता असे आपल्याच मित्रपक्षाच्या पदाधिकाऱ्याला धमकावणे बरोबर नाही. शेवटी आपण महायुतीचे घटक आहोत. आपण नोंद घ्याल, अशी अपेक्षा करतो', असे त्यांनी म्हटलं आहे. आता नितेश राणे यांच्या पोस्टला निलेश राणे काय प्रत्युत्तर देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र, या पोस्टमुळे सिंधुदुर्गातील महायुतीत तणाव वाढण्याची शक्यता आहे.

निलेश राणेंकडून नितेश राणेंना सल्ला

नितेश राणेंनी एका सभेत भाषण करताना, 'सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचाच मुख्यमंत्री बसला आहे, सगळ्यांनी लक्षात ठेवा, असे वक्तव्य केलं होतं. त्यानंतर नितेश राणेंचे बंधू निलेश राणेंनी त्यांना एक्स पोस्टद्वारे सल्ला दिला. 'नितेशनं जरा जपून बोलावं. मी भेटल्यावर बोलेनच पण आपण बोलताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोललं पाहिजे. सभेत बोलणं सोप्पे आहे, पण आपल्या बोलण्यामुळे नेमकं कुणाचा फायदा होतोय, याचं भान असलं पाहिजे, आपण महायुतीमध्ये आहोत विसरून चालणार नाही', असं त्यांनी म्हटलं होतं. निलेश राणे यांनी पोस्ट केल्यानंतर नितेश राणेंनी यावर मिश्कील प्रतिक्रिया दिली. 'निलेशजी तुम्ही टॅक्स फ्री आहात', असं त्यांनी म्हटलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

SCROLL FOR NEXT