Devendra Fadnavis Saam TV
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीसांच्या वजनाएवढं रक्तदान करण्याचा राणा दाम्पत्याचा निर्धार

अमरावतीमध्ये आज दहीहंडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या दहीहंडीला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

अमरावती: अमरावतीमध्ये आज दहीहंडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या दहीहंडीला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची प्रमुख उपस्थित राहणार आहेत. शिवाय बॉलिवूड स्टार देखील या दहीहंडी स्पर्धेसाठी उपस्थित असणार आहेत.

आजच्या या दहीहंडीच्या (Dahihandi) पार्श्वभूमीर राणा दाम्पत्यांकडून रक्तदान शिबीराचं आयोजन करण्यात आलं आहे. या रक्तदान शिबीरावेळी वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रक्ततुला करण्यात येणार होती मात्र ती रक्ततुला आता रद्द करण्यात आली आहे. मात्र, फडणवीस यांच्या वजनाएवढं रक्तदान केलं जाणार आहे.

पाहा व्हिडीओ -

दरवर्षीप्रमाणे विदर्भातील मोठी दहीहंडी (Dahi Handi 2022) म्हणून प्रसिद्ध असलेली अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्या युवा स्वाभिमान पार्टीची दहीहंडी आज रविवारी २१ ऑगस्ट रोजी साजरी करण्यात येत आहे. या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रक्ततुला देखील करण्यात येणार होती. मात्र, प्रोटोकॅालमुळे फडणवीस यांची रक्ततुला रद्द करण्यात आली आहे. मात्र, फडणवीस यांच्या वजना इतकं रक्तदान केलं जाणार आहे.

काँग्रेसकडून टीका -

राज्यात शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट आहे आणि दुसरीकडे उपमुख्यमंत्र्यांची रक्ततुला केली जात आहे. इव्हेंट केले जात आहत. वेळ बरोबर नाही, शेतकरी मरतो आहे, महागाई वाढत आहे, बेरोजगारी वाढत आहे, त्यावर कोणी बोलेल की नाही, अशी टीका काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या येशोमती ठाकूर यांनी केली केली होती.

रोहित पवारांनी केलेलं समर्थन -

रक्तदान असेल, अन्नदान असेल, हे मोठं दान आहे. चांगल्या हेतूने रक्ततुला करत असतील तर त्यात गैर नाही. पण लोकांकडून घेतलेले रक्त वाया जाणार नाही, याची काळजी संबंधीत संस्थेनं घेतली पाहिजे असं आमदार रोहित पवार म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HBD Sanjay Dutt : बॉलिवूडचा मुन्नाभाई किती कोटींचा मालक?

Dharashiv Crime : बँकेची लोखंडी खिडकी तोडून चोरट्यांचा आत प्रवेश; दरोड्याचा प्रयत्न फसला

Sangali Nag Panchami : सांगलीकरांची २३ वर्षांची प्रतीक्षा संपली, जिवंत नाग पकडण्याला परवानगी, नेमकं प्रकरण काय?

Honey Trap : नाशिकनंतर सांगलीतही हनी ट्रॅप, २ माजी मंत्र्यांचा सहभाग, खडसेंचा खळबळजनक दावा

Maharashtra Live News Update : माणिकराव कोकाटे अजित पवारांच्या भेटीसाठी रवाना, राजीनामा देणार का?

SCROLL FOR NEXT