Ramraje Naik Nimbalkar, Ranjitsinh Naik Nimbalkar
Ramraje Naik Nimbalkar, Ranjitsinh Naik Nimbalkar saam tv
महाराष्ट्र

Satara News: रामराजे नाईक निंबाळकरांना काेणाचं राजकारण कळेना ?

ओंकार कदम

Ramraje Naik Nimbalkar News: सध्याचे खासदार आमदाराचे पीए झाले आहेत. त्यामुळे त्यांचं काय राजकारण सुरू आहे हे मला कळत नाही अशी टीका विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांनी भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsinh Naik Nimbalkar) यांच्यावर केली आहे. फलटण येथील वाठार निबळकर येथे राजे एका मेळाव्यात बाेलत हाेते.

फलटण (phaltan) येथील वाठार निबळकर येथे विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी शेतकऱ्यांचा भव्य मेळावा घेतला होता. या मेळाव्याला आजूबाजूच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव उपस्थित झाले होते.

या मेळाव्यात बोलत असताना रामराजे नाईक निंबाळकर यांनी माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरे यांच्यावर सडकून टीका केली. (Maharashtra News)

रामराजे म्हणाले वास्तविक पाहता एका खासदाराच्या पोटात (मतदारसंघात) सहा आमदार असतात परंतु फलटण तालुक्यातील उलटच झाले आहे. तांत्रिक बाबींवर त्यांची आणि माझी कधी ही चर्चा होऊदे पण त्यांचं राजकारणच मला कळत नाही.

या आधी चिमणराव कदम (chimanrao kadam), हिंदुराव नाईक निंबाळकर (hindurao naik nimbalkar) आम्ही थेट एकमेकांवर बोलत होतो.

पण सध्याचे खासदार भांडायला तिसराच माणूस घेऊन येतात. तो मला बोलतो आणि खासदार गप्प बसतात, सध्याचे खासदाराचे आमदाराचे पीए झालेत.

त्यामुळे त्यांचं काय राजकारण सुरू आहे हे मला कळत नाही असेही रामराजेंनी भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरे यांच्यावर टीका केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Black Pepper Benefits: काळी मिरी खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, घ्या जाणून

Marathi Manus : महाराष्ट्रात मराठी माणसाला अशी वागणूक, म्हणे 'नॉट वेलकम'! मराठी तरूणाच्या मनाला काय वाटलं? वाचा

Today's Marathi News Live : PM मोदी देशाची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या स्थानी आणणार- फडणवीस

Yashwant Killedar MNS | मनसे आणि ठाकरे गट शिवाजी पार्क कुणाला?

Kesar Benefits : केसरचे आरोग्यासाठी भन्नाट फायदे

SCROLL FOR NEXT