मोदी संविधान बदलणार, आरक्षण रद्द करणार; असा अपप्रचार केला जातोय - रामदास आठवले Saam
महाराष्ट्र

मोदी संविधान बदलणार, आरक्षण रद्द करणार; असा अपप्रचार केला जातोय - रामदास आठवले

'उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) ऐवजी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवाव आणि एकत्र यावं अस आमचं उद्धव ठाकरे यांना आवाहन आहे.'

अभिजीत सोनावणे, सामटीव्ही नाशिक

नाशिक : कोरोनामुळे देशात ५ लाख मृत्यू झाले आहेत त्यामुळे नागरिकांनी गर्दी टाळायला हवी कोरोनाचा सामना करण्याची जबाबदारी जशी सरकारची तशी आपलीदेखील आहे. तसंच संपुर्ण देशापैकी २५ टक्के केसेस महाराष्ट्रात असून आपण काळजी घ्यायला हवी. उद्धव ठाकरेंनी लवकर बर होऊन कोरोना (Corona) विरोधात दंड थोपटावे अशी आपली अपेक्षा असल्याचं वक्तव्य केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी आज नाशिक येथे केलं. ते म्हणाले, 'उद्धवजी आणि आमचे घरोब्याचे संबध आहेत. भीमशक्ती-शिवशक्ती एकत्र आलो होतो. दलित पँथरला ५० वर्षे पूर्ण झाले त्याला पुनर्जीवित करण्याची गरज असून येणाऱ्या ५ राज्याच्या निवडणुकीत आम्ही भाजपसोबत (BJP) राहणार, मात्र युती झाली नाही तर आम्ही आमचं वेगळं लढणार असल्याचंही आठवले यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान पंजाबमध्ये काँग्रेसने (Congress) विश्वास गमावला असून. बाबासाहेबांच संविधान बद्दलण्यासाठी आणि दलितांच आरक्षण रद्द करण्यासाठी मोदी सरकार सत्तेवर आले आहे असा अपप्रचार केला जात असल्याचंही ते म्हणाले. तर उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) ऐवजी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवाव आणि एकत्र यावं अस आमचं उद्धव ठाकरे यांना आवाहन असल्याचही ते म्हणाले.

हे देखील पहा -

दरम्यान भाजपला विश्वास होता की काँग्रेस सेना राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापनेसाठी पाठींबा देणार नाही आणि त्यांचा तो अंदाज चुकला असल्याचही त्यांनी सांगितलं तसंच भाजपने शिवसेनेला ५ वर्ष मुख्यमंत्री पद द्यावं या मुद्द्यावर एकत्र येऊ शकता भाजपने याचा विचार करावा असा सल्ला देखील त्यांनी भाजपला यावेळी दिला.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: पालघरमध्ये वऱ्हाडाच्या ट्रकला कंटेनरची धडक, १२ जणांचा मृत्यू; मुंबई- अहमदाबाद महामार्गावर रक्ताचा सडा

Maharashtra News Live Update: अकोल्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Makeup Box Full Kit: परफेक्ट मेकअप लूकसाठी बॉक्समध्ये असायला पाहिजेत 'हे' ब्यूटी प्रॉडक्ट

Fort Near Lonavala : लोणावळ्याजवळील ऐतिहासिक ठिकाण, हिरवागार निसर्ग फिरून झाल्यावर करा 'या' किल्ल्यावर भटकंती

सहा महिन्यात सरकार कोसळणार; आमदाराच्या दाव्यानं तमिळनाडूतील राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT