Ramdas Athawale
Ramdas Athawale  Saam Tv
महाराष्ट्र

'काँग्रेसने पाठिंबा काढला तर...'; रामदास आठवले यांचे महाविकास आघाडीवर भाष्य

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमध्ये बिघाडी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. काँग्रेस महाविकास आघाडी सरकारमध्ये राहणार की जाणार ? यावर आज दिल्ली काँग्रेस हायकमांडकडून निर्णय घेण्यात येणार आहे. महाविकास आघाडीच्या बिघाडीवर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अनेक आमदार महा विकास आघाडीवर नाराज आहेत. काँग्रेसने ( Congress ) पाठिंबा काढला तर अडीच वर्षाची सत्ता आम्ही बनवणार, अशी वक्तव्य आठवले यांनी केले आहे. ते औरंगाबादमध्ये बोलत होते. ( Ramdas Athawale Latest News In Marathi )

हे देखील पाहा -

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. या औरंगाबाद दौऱ्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी रामदास आठवले म्हणाले, 'अनेक आमदार महाविकास आघाडीवर नाराज आहेत. काँग्रेसने पाठिंबा काढला तर अडीच वर्षाची सत्ता आम्ही बनवणार. शिवसेनेला अडीच वर्षाचा आम्ही फॉर्मुला दिला होता, मात्र शिवसेनेने धोका दिला. आम्ही नाही काही केलं.

यावेळी आठवले यांनी राज्यसभेच्या उमेदवारीवर देखील भाष्य केले. त्यावेळी रामदास आठवले म्हणाले,' राज्यसभा निवडणुकीच्या सातव्या उमेदवारांसाठी घोडेबाजार होणार नाही. त्या जागेवर भाजपचा उमेदवार निवडून येईल. घोडेबाजार करण्याची आम्हाला गरज नाही, कारण संख्याबळ आमच्याकडे आहे. आम्हाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. सातवा उमेदवार आधी आम्ही टाकला नाही. त्यात अपक्ष आमदार आमच्या सोबत आहेत. त्यामुळे आमचा सातवा उमेदवार निवडून येईल.

दरम्यान, आठवले यांनी सुप्रिया सुळे (Supriya Sule ) यांच्या मुख्यमंत्री बनण्याच्या वक्तव्यावरही भाष्य केलं. आठवले म्हणाले, 'लोकं ठरवतील पण सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्रीसाठी संधी मिळेल असे वाटत नाही. सध्या राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल अशी परिस्थिती नाही'. तसेच त्यांनी औरंगजेबाच्या कबरीवर जाण्याने झालेल्या वादावरही भाष्य केलं. 'जे काही लोक औरंगजेबाच्या कबरीवर गेले होते ते मुस्लिम असतील, पण त्यांनी जायला नको होतं, असं आठवले म्हणाले. तसेच औरंगाबाद जिल्हा नामकरण वादावर त्यांनी संभाजीनगरला विरोध नाही पण औरंगाबादला पाठींबा असल्याचे सांगितले.

Edited By - Vishal Gangurde

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : रवींद्र वायकर यांच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गटाचे शक्तिप्रदर्शन

DHFL: 34000 कोटींच्या बँक घोटाळ्या प्रकरणी CBI ची मोठी कारवाई, DHFL चे माजी संचालक धीरज वाधवान यांना अटक

Maharashtra Rain: वादळी वारे अन् तुफान गारपीट, पुणे- सातारा, सांगलीला अवकाळी पावसाने झोडपलं; पाहा VIDEO

Rain News: अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका, शिरूरमध्ये पावसामुळे केळीची बाग भुईसपाट

Maharashtra Weather News: पुढच्या ४८ तासांत या जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पडणार मुसळधार पाऊस; हवामान खात्याचा इशारा

SCROLL FOR NEXT