Jayant Patil  saamtv
महाराष्ट्र

Jayant Patil: '..त्यांनी महायुतीत यावं, मी मध्यस्थी करायला तयार'; केंद्रीय मंत्र्याची जयंत पाटलांना मोठी ऑफर

Jayant Patil Political News: राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. शशिकांत शिंदे नवे अध्यक्ष तर रामदास आठवले यांनी महायुतीत येण्याचं आमंत्रण दिलं आहे.

Bhagyashree Kamble

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात आज मोठी घडामोड घडली. पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी आज प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर पक्षप्रमुख शरद पवार यांनी शशिकांत शिंदे यांची एकमताने नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषणा केली. जयंत पाटील यांच्या राजीनाम्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलंय. पाटील पक्ष सोडणार का? असा प्रश्न निर्माण झालाय. अशातच केंद्रीय राज्यमंत्र्याने जयंत पाटील यांना महायुतीत येण्याची थेट ऑफर दिली.

जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी त्यांचं कौतुक केलं. तसेच महायुतीत येण्याची ऑफर दिली. 'जयंत पाटील यांचं तिथे मन लागत नसेल, किंवा त्यांना मार्ग बदलायचा असेल, तर त्यांनी महायुतीसोबत यावं', असं आठवले म्हणालेत. दरम्यान, जयंत पाटील त्यांची ऑफर स्वीकारणार का? हे पाहणं आता म्हत्वाचं ठरणार आहे.

रामदास आठवले नेमकं काय म्हणाले?

'जयंत पाटील हे कष्टालू आणि संघर्षशील नेते आहेत. पाटील यांनी राजीनामा दिला आणि त्यांना विकास करायचा असेल, तर त्यांनी सत्येसोबत यायला हवं', असं आठवले म्हणाले. तसेच 'राष्ट्रवादी (शरद पवार गट) सोडणार असाल तर, मी मध्यस्थी करून त्यांना राष्ट्रवादीत (अजित पवार गट) आणायला तयार आहे', असंही रामदास आठवले म्हणाले आहेत.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे वाळवा दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पत्रकारांसोबत संवाद साधताना त्यांनी जयंत पाटील यांनी महायुतीत यावं, त्यांनी याबाबत विचार करावा, असं आठवले म्हणाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ration Card Fraud: बोगस रेशन कार्ड वाटप, १०० लोकांकडून प्रत्येकी ३००० उकळले, अकोल्यातील घटनेने राज्यात खळबळ

Maharashtra Live News Update: जालन्यातील कार आणि दुचाकीचा भीषण अपघात

Eknath Shinde : निवडणुकीआधी एकनाथ शिंदेंनी डाव टाकला, महायुतीत आणखी एका पक्षाची एन्ट्री

ITR Filling: पगारदार वर्गासाठी महत्त्वाची बातमी! आयटीआर फाइल करताना या ७ गोष्टी नेहमी लक्षात ठेवाच

Movie Price : आता फक्त 200 रुपयांत पाहा चित्रपट, सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT