रामदास आठवले  Twitter/ @ANI
महाराष्ट्र

रामदास आठवलेंकडून शिवसेनेला पुन्हा भाजपाशी युती करण्याचे आवाहन

2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाल बहुमत मिळूनही सत्ता स्थापन करण्यात आली नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : ''शिवसेनेने (Shivsena) भाजपबरोबर (BJP) परत यावे. उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) हे अजून एक वर्ष मुख्यमंत्री (Chief Minister) राहू शकतात. त्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)यांना अडीच वर्षे मुख्यमंत्री केले जाऊ शकते. शिवसेनेने आपला विचार बदलण्याची गरज आहे.'' असे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी व्यक्त केले आहे. याशिवाय, राज्यातील महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) काही दिवसानंतर पडेल, अशी टिप्पणी अशी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. (Ramdas Athavale calls on Shiv Sena to form alliance with BJP again)

राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसमध्ये सुरू असलेल्या घडामोडींमधून अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत. अशातच शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी बीजेपीसोबत पुन्हा जाण्याच्या वक्तव्यानंतर रामदास आठवलेची ही प्रतिक्रिया आली आहे. दरम्यान 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाल बहुमत मिळूनही सत्ता स्थापन करण्यात आली नाही. शिवसनेने अडीच वर्षाचे मुख्यमंत्री पदाची मागणी केल्यानंतर भाजपा आणि शिवसेनेत संघर्ष निर्माण झाला. राज्यात विधानसभा निवडणुकीत भाजपानंतर बहुमत मिळवणार शिवसेना हा दूसरा पक्ष होता. मात्र भाजपाने अडीच वर्षांचे मुख्यमंत्री पद देण्यास नकार दिल्यानंतर शिवसनेने भाजपाशी गेल्या अनेक वर्षांपासून आलेली युती तोडली.

त्यानंतर राज्यातील इतर दोन पक्षांनी म्हणजेच राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसने शिवसेनाला पाठिंबा दिला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि कॉंग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पाठिंबा दिला. त्यानंतर राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या तीन पक्षांनी मिळून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. या सरकारमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर भाजपाला बहुमत मिळूनही विरोधी पक्षात बसावे लागले.

मात्र त्यानंतरही राज्यात तीन पक्षांचे हे सरकार लवकरच पडेल आणि भाजपाची सत्ता येईल अशा चर्चा सुरू आहेत. अशातच काही दिवसांपूर्वी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री पदाबद्दल आपली इच्छा व्यक्त केली. त्यानंतरही ऑपरेशन लोटसच्या चर्चा, माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरण, प्रताप सरनाईक प्रकरण यामुळे राज्यात पुन्हा सत्ताबदलाच्या चर्चाना उधाण आले. मात्र तरीही महाविकास आघाडीतील नेत्यांनी हे सरकार पुढील पाच वर्षे चालणार असा विश्वास व्यक्त केला आहे. मात्र तरीही भाजपा सत्ताकाळात मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी शिवसेनेला भाजपाशी पुन्हा युती करण्याचे वक्तव्य केले आहे. आता रामदास आठवले यांच्या या विधानावर शिवसेना काय उत्तर देते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Porsche Accident : पोर्शे अपघाताला ६ महिने पुर्ण; रस्त्यावर उतरत तरुणाईची मेणबत्ती पेटवून आदरांजली

Dance Viral Video: महिलांची कमाल! नऊवारी साडी नेसून महिलांनी धरला 'ही पोगरी असली' गाण्यावर ठेका;Video व्हायरल

Udhav Thackarey News : 90 हजार बूथवर गुजरातची माणसं, उद्धव ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप

Parenting Tips: पॅरेंटल बर्नआउटचे बळी ठरू शकतात पालक; हे आहे मुख्य कारण

Tiger Life: वाघ किती वर्षे जगतो?

SCROLL FOR NEXT