Shreya Maskar
मंगळवारी गणेशाला प्रसाद म्हणून गोड उकडीचे मोदक बनवा. अगदी झटपट होणारी रेसिपी लिहून घ्या.
उकडीचे मोदक बनवण्यासाठी तांदळाचे पीठ, पाणी, ओल्या नारळाचा किस, गूळ, वेलची पूड, केशर, तूप, खसखस, मीठ, गुलकंद, ड्रायफ्रूट्स इत्यादी साहित्य लागते.
उकडीचे मोदक बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये तूप टाकून त्यात पाणी, चिमूटभर मीठ आणि तूप टाकून एक उकळी काढून घ्या. गॅस मध्यम आचेवर ठेवा.
आता यात तांदळाचे पीठ घालून 5 मिनिटे त्यावर झाकण ठेवून उकड काढून घ्या. पीठाला तूप लावून मिनिटांसाठी बाजूला ठेवा.
मोदकाचे सारण बनवण्यासाठी पॅनमध्ये तूप, ओल्या नारळाचा किस, खसखस आणि गूळ हे मिश्रण एकजीव करून घ्या. तुम्हाला आवडेल तसे गोडाचे प्रमाण ठेवा.
त्यानंतर यामध्ये वेलची पूड, गुलकंद, केशर, ड्रायफ्रूट्सचे तुकडे घालून मिक्स करा. काजू, बदाम आणि पिस्ता छान लागतील.गूळ विरघळेपर्यंत मिश्रण ढवळत राहा.
मळलेल्या तांदळाच्या पीठाचे लहान गोळे करून त्याची पारी बनवा. यात नारळाचे गोड सारण भरून मोदकाचा आकार द्या.
गॅसवर मोदकाचे भांडे ठेवून 10 ते 15 मिनिटे मोदक चांगले वाफवून घ्या. गरमागरम मोदकावर तूप सोडून त्यांचा आस्वाद घ्या.