Sujay Vikhe Patil - Ram SHinde  Saam TV
महाराष्ट्र

Ram Shinde News : राम शिंदे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक, सुजय विखे पाटलांचा पत्ता कट होणार?

Ram Shinde News : एक वर्षभराच्या तयारीनीशी लोकसभा लढवण्यासाठी देखील तयार आहे, असं राम शिंदे यांनी म्हटलं.

साम टिव्ही ब्युरो

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवारीवरुन रस्सीखेत होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण माजी मंत्री आणि भाजप नेते राम शिंदे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी इच्छूक असल्याचं म्हटलं आहे. मात्र राम शिंदे यांच्या भूमिकेमुळे भाजपचे विद्यमान खासदार सुजय विखे पाटलांचं काय होणार? असा सवाल उपस्थित झाला आहे.

लोकसभा 2019च्या निवडणुकीत सुजय विखे पाटील यांना निवडून आणण्यासाठी पालकमंत्री म्हणून माझ्यावर मोठी जबाबदारी होती. तेव्हा ती जबाबदारी पार पाडली. परंतु २०२४ च्या निवडणुकीत मी विधानसभा लढवणार आहे. (Political News)

पण मनाची तयारी ठेवली आहे की परिस्थिती आली तर लोकसभा देखील लढवायची. पक्षाचा आदेश पाळणारा मी कार्यकर्ता असल्याने आता यावेळी एक वर्षभराच्या तयारीनीशी लोकसभा लढवण्यासाठी देखील तयार आहे, असं राम शिंदे यांनी म्हटलं. (Latest Marathi News)

राम शिंदे यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याने सुजय विखे पाटलांची चिंता वाढली आहे. सुजय विखे यांचा पत्ता कट होणार का? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी खासदार सुजय विखे पाटील तयारीला लागले आहेत. सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्यात लोकसभा निवडणुकीत लढत होईल अशी शक्यताही वर्तवली जात आहे. मात्र आता राम शिंदेंनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याने सुजय विखे पाटील यांचं टेन्शन वाढले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dates Benefits: खजूर खाण्याचे हे ७ फायदे माहितीयेत का?

Mumbai Shocking : मुंबई हादरली ! १५ वर्षीय मुलीवर जन्मदात्या वडिलांकडून बलात्कार, आईचाही समावेश

Shravana 2025: श्रावणात शिवलिंग पूजा करताना 'या' ७ वस्तू टाळा, होऊ शकतो अपशकुन

Liver cirrhosis last stage: लिव्हर सिरोसिसच्या लास्ट स्टेजमध्ये शरीरात होतात 'हे' मोठे बदल; यकृत सडण्याची लक्षणं वेळीच ओळखा

HBD Ranveer Singh : रणवीर सिंहचं ५ सुपरहिट चित्रपट, पहिला सिनेमा कोणता?

SCROLL FOR NEXT