Markadwadi solapur malshiras : भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांनी थेट शरद पवार यांना आव्हान दिलेय. बॅलेट पेपरवर निवडणुकीसाठी तयार आहे. हे आव्हान मी स्विकारतो, असे वक्तव्य राम सातपुते यांनी मारकडी येथे केलेय. यावेळी त्यांनी सुप्रिया सुळे यांनीही राजीनामा द्या, बारामतीमध्ये बॅलेटपेपर निवडणुका घ्याव्यात, अेही राम सातपुते यांनी सांगितले. शरद पवार आज मारकडवाडी येथे आले होते. त्यानंतर राम सातपुतेही मारकडवाडीमध्ये दाखल झाले. यावेळी राम सातपुते यांनी रणजितसिंह मोहिते पाटीलयांच्यावरही निशाणा साधला.
मोहीते पाटील आणि त्यांच्या गुडांनी मारकडवाडीतील ग्रामस्थांना धमक्या दिल्या. पोट निवडणुकीचं आव्हान मी स्विकारतो. बॅलेटवर पोट निवडणूक घेण्यासाठी मी तयार आहे, असे राम सातपुते म्हणाले.
रणजितसिंह मोहीते पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत पैसे वाटले, त्यांच्या गुंडांनी धमकावले. त्यामुळे माझा पराभव झाला. रणजितसिंह मोहिते पाटील हे सर्व मारकरवाडी प्रकरणाचे मास्टर माईंड आहेत. रणजितसिंह मोहीते पाटील यांच्यावर पक्ष कारवाई करेलच. पण जनाची नाही तर मनाची लाज बाळगून पदाचा राजीनामा द्यावा, असा टोला राम सातपुते यांनी लगावला.
मोहिते पाटील यांचे गुंड मारकड वाडीत दहशत येत करत आहेत. यांचं कोणीही येऊ द्या, आमचे गोपीचंद पडळकर येत आहेत. त्याशिवाय आकलूजमध्ये आम्ही देवेंद्र फडणवीस यांचा नागरी सत्कार घेण्याचा विचार करत आहोत, असे राम सातपुते यांनी सांगितले.
ईव्हीएमचे भांडे फोडायचे असेल तर पवार साहेबांनी सुप्रिया सुळे यांना बारामती येथून राजीनामा द्यायला सांगून मत पत्रिकेवर मतदान घ्यावे. उत्तम जानकर यांचा बळी देण्यापेक्षा सुप्रिया सुळे यांचा राजीनामा घेऊन मत पत्रिकेवर मतदान घ्या, असा सल्ला माजी आमदार राम सातपुते यांनी दिला.
मारकडवाडी गावात देशातील कुठलाही नेता येऊ देत. या सर्व गोष्टींना उतारा म्हणून भाजपकडून येत्या २ दिवसात आमदार गोपीचंद पडळकर यांची सभा होणार आहे. यामुळे मारकडवाडी येथून गोपीचंद पडळकर हे थेट आता शरद पवार यांच्याशी भिडणार आहेत, असे सातपुते यांनी सांगितले.
मारकडवाडीतून शरद पवार माघारी फिरताच माजी आमदार राम सातपुते यांच्या समर्थनार्थ ग्रामस्थांनी घोषणाबाजी करत जय श्रीराम असा नारा दिला. ईव्हीएम हटाव देश बचाओ असा नारा देत येथील ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मारकडवाडी येथे येऊन ग्रामस्थांची संवाद साधला. शरद पवार गावातून माघारी फिरताच भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. त्यांनी माजी आमदार राम सातपुते यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत उत्तम जानकर यांच्यावर टीका केली आहे.
माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावातून ईव्हीएमला विरोध होत आहे. बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. आज मारकडवाडी गावाला शरद पवार यांनी भेट दिली आहे. याच दरम्यान गावातील दुसरा गट पुढे आला आहे. गावातून भाजप उमेदवार राम सातपुते यांना जे लीड मिळालं ते त्यांच्या विकास कामांमुळे मिळालेला आहे. ईव्हीएम मशीन मध्ये कुठलाही घोळ झाला नाही. आमदार उत्तम जानकर यांची स्टंटबाजी सुरू आहे. असा आरोप आता मारकडवाडी गावातीलच दुसऱ्या गटांनी केला आहे. शरद पवारांच्या सभेला स्थानिक मारकडवाडी मधील एकही मतदार उपस्थित नाही. गावाच्या बाहेरचे लोक आलेले आहेत असा आरोप केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.