Ram Mandir News Saam Digital
महाराष्ट्र

Ram Mandir News: 10 हजार स्वेअर फूटात लाखो मातीचे दिवे, महाराष्ट्राच्या या शहरात साकारण्यात आलीय राम मंदिराची भव्य प्रतिकृती

Ram Mandir News Update: मातीच्या लाखो पणत्या, कलेचा अद्भुत संगम आणि हजारो हातांच्या परिश्रमातून प्रभू श्रीरामांची सुंदर अशी प्रतिकृती तयार करण्याची किमया जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावकरांनी करून दाखवली आहे.

Sandeep Gawade

Ram Mandir News

मातीच्या लाखो पणत्या, कलेचा अद्भुत संगम आणि हजारो हातांच्या परिश्रमातून प्रभू श्रीरामांची सुंदर अशी प्रतिकृती तयार करण्याची किमया जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावकरांनी करून दाखवली आहे. ही प्रतिकृती तब्बल 10 हजार स्वेअर फूटात साकारण्यात आली आहे. त्यासाठी मातीचे 2 लाख 10 हजार दिवे वापरण्यात आलेत. भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आलाय. ही कलाकृती पाहण्यासाठी चाळीसगावात जनसागर लोटला आहे. संपूर्ण देशभरात मातीच्या दिव्यांचा वापर करून श्रीरामाची एवढी अवाढव्य प्रतिकृती कुणीही साकारलेली नाही. हा विश्वविक्रम जळगावच्या नावे असल्याचा दावा केला जात आहे.

डोंबिवलीत श्रीराम मंदिर रथाच्या प्रतिकृतीची भव्य मिरवणूक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार श्रीकांत शिंदे यांनी अयोध्या श्रीराम मंदिर रथाच्या प्रतिकृतीची उभारणी केली आहे. डोंबिवली पश्चिममध्ये या भव्य रथाची मिरवणूक बुधवारी मोठ्या जयघोषात निघाली. डोंबिवली पश्चिम येथील पु.बा. भावे सभागृहापासून अयोध्या राम मंदिर रथयात्रेला प्रारंभ झाला. कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी श्रीराम रथाचे मनोभावे पूजन केलं.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यावेळी फुलांची उधळण करीत जय श्रीरामच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने राम रथ मिरवणुकीत सहभागी झाले होते. पश्चिम येथील पु बा भावे सभागृहापासून सुरू झालेल्या रथयात्राची संपूर्ण डोंबिवलीतील प्रमुख रस्त्यावरून मिरवणूक काढण्यात आली. डोंबिवलीकर मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Care: जेवल्यानंतर या ७ चुका केल्याने वजन कधीच कमी होतं नाही, तुम्हीही करताय का चुका?

Maharashtra Live News Update : साताऱ्यात मुसळधार पावसासह गारांचा पाऊस; रानगेघर, करंदी परिसरात गहू-ज्वारीचे नुकसान

Tadgola Benefits: कडाक्याच्या उन्हात ताडगोळे खाल्याने कोणकोणते फायदे होतात, ही माहिती एकदा वाचाच

Mumbai news: मुंबई हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या

कागलमध्ये ₹357.99 कोटींचा सर्व्हिस रोडसह 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा

SCROLL FOR NEXT