आदिवासी पाड्यावर झाडांना राखी बांधून साजरे झाले रक्षाबंधन प्रदीप भणगे
महाराष्ट्र

आदिवासी पाड्यावर झाडांना राखी बांधून साजरे झाले रक्षाबंधन

अनुबंध या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून कल्याणच्या सापर्डे येथील पाणबुडे नगर आदिवासी वाडीतील महिला, मुलं आणि मुलींनी झाडांना राख्या बांधून पर्यावरण रक्षणचा आणि संवर्धनाचा संदेश दिला.

प्रदीप भणगे

कल्याण : एकीकडे संपूर्ण देशभरात आज बहीण-भावाकडून रक्षाबंधनाचा सण साजरा होत असताना कल्याणच्या आदिवासी पाड्यावर मात्र, अनोख्या पध्दतीने हा सण साजरा झालेला पाहायला मिळाला. "अनुबंध" या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून कल्याणच्या सापर्डे येथील पाणबुडे नगर आदिवासी वाडीतील महिला, मुलं आणि मुलींनी झाडांना राख्या बांधून पर्यावरण रक्षणचा आणि संवर्धनाचा संदेश दिला.

हे देखील पहा -

कल्याणच्या पाणबुडे नगर आदिवासी वस्तीतील मुलांनी नुकत्याच झालेल्या पर्यावरण दिनाचे औचित्य साधून विविध प्रकारची झाडं लावून त्यांचे पालकत्व स्विकारले असून आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे ही आदिवासी मुलं या झाडांचा सांभाळ करत आहेत. परिवारणाबद्दल कृतज्ञता म्हणून आजचा रक्षाबंधनाचा हा सण या आदिवासी बांधवांनी या झाडांसोबत साजरा केला आहे. ज्याप्रमाणे बहीण आपल्या भावाला ओवाळते आणि मग राखी बांधते अगदी त्याचप्रमाणे या आदिवासी महिला आणि मुलांनी झाडांना ओवाळून राख्या बांधल्याचे दिसून आले. बहीण-भावाच्या या नात्याबरोबरच आज पर्यावरणाचे रक्षण करणे हीदेखील काळाची गरज बनली आहे.

पर्यावरण रक्षणाची जबाबदारीही आपलीच असून आजच्या निमित्ताने ते कृतीतून दाखवून देण्याचा प्रयत्न केल्याचे आदिवासी बांधवांनी सांगितले. तर आजचा सण हा राखी बांधण्यापुरता न राहता मुलींचे शिक्षण, त्यांची सुरक्षितता, लहान वयातील विवाह, मारहाण या सर्वांपासूनही त्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असल्याचे अनुबंध संस्थेच्या विशाल जाधव यांनी यावेळी सांगितले. हा अनोखा उपक्रम यशस्वी करण्यासाठी बाळा शिंदे, सूर्यकांत कोळी, विशाल कुंटे, नचिकेत कुलकर्णी (माणगाव), वैभव देशमुख, प्रभाकर घुले, राहुल साबळे यांच्यासह वस्तीतील इतर सर्व जण उपस्थित होते.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Kharat: भोंदू खरातचा पंचतारांकित 'अड्डा', मुंबईतल्या हॉटेलमधून चालवायचा हवाला रॅकेट

White House Firing: मोठी बातमी ! अमेरिकेच्या व्हाइट हाउसजवळ गोळीबार

Maharashtra Politics: शरद पवारांची दिल्लीवारी, उद्या होणार शपथविधी

India vs Pakistan: भारतावर हल्ला करणार, पाकिस्तानची पोकळ धमकी

Mumbai Local: हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत, सिवूड्स ते जुईनगरदरम्यान तांत्रिक बिघाड; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT