रायगडात यावर्षीही नारळी पोर्णिमेवर कोरोनाचे संकट

नारळी पौर्णिमा हा कोळी बांधवांचा महत्वाचा सण असतो. पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो. समुद्राला शांत करण्यासाठी नारळी पौर्णिमेला कोळी बांधव वाजत-गाजत व नाचत समुद्राला नारळ अर्पण करतात.
 नारळी पोर्णिमेवर कोरोनाचे संकट
नारळी पोर्णिमेवर कोरोनाचे संकटsaamtv
Published On

राजेश भोस्तेकर

रायगड: राखी पौर्णिमा आणि नारळी पौर्णिमा हा सण आज जिल्ह्यात उत्साहात साजरा झाला. राखी पोर्णिमेसोबत आज नारळी पौर्णिमा सण ही साजरा झाला असला तरी कोरोनाचे संकट यावर्षीही या सणावर होते. नारळी पौर्णिमा हा सण कोळी बांधवांचा महत्वाचा सण असतो. पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो.

हे देखील पहा -

समुद्राला शांत करण्यासाठी नारळी पौर्णिमा सणाला कोळी बांधव वाजत गाजत नाचत नारळ समुद्राला अर्पण करतात. त्यानंतर खऱ्या अर्थाने समुद्र शांत होतो. मात्र कोरोनामुळे धार्मिक सणावर शासनाने निर्बंध लावले असल्याने समुद्रावर नारळ वाहण्यासाठी यावेळी गर्दी पाहायला मिळाली नाही. अलिबाग तालुक्यातील धरमतर खाडीवर नारळ पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी होती. धरमतर खाडीत नारळ टाकल्यानंतर तो नारळ शंभर फूट उंच पुलावरून खाडीच्या पाण्यात उड्या टाकून तरुण काढतात.

 नारळी पोर्णिमेवर कोरोनाचे संकट
उस्मानाबाद । सीमेवरील जवानांना यंदा राख्या पाठवल्याचं नाहीत!

हा खेळ पाहण्यासाठी हजारो नागरिक दरवर्षी जमा होत असतात. यावर्षीही नागरिक नारळ टाकण्यासाठी मोठ्या संख्येने जमा झाले होते. मात्र कोरोना निर्बंध असल्याने पोयनाड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सर्व नागरिकांना हटकले. त्यामुळे धरमतर येथून नारळ टाकण्याचा खेळ पोलिसांनी उधळून लावला. जिल्ह्यात नारळी पौर्णिमा सणावर कोरोनाचे संकट असल्याने समुद्र, खाडी किनारी यावेळी तुरळक गर्दी नारळ टाकण्यासाठी पाहायला मिळत होती.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com