Navneet Rana’s reaction after Rajya Sabha ticket denial triggers fresh political debate in Maharashtra. Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: 'संघर्ष करना मेरे लिये...; ऐन राज्यसभा निवडणुकीवेळी भाजपचं टेन्शन वाढणार, महिला नेत्या पक्षाला रामराम ठोकणार?

Rajya Sabha Elections : भाजपने महाराष्ट्रातून राज्यसभेचे उमेदवार जाहीर केले आहेत. याचदरम्यान नवनीत राणा यांनी ठेवलेले व्हॉट्सअॅप स्टेटसमुळे राजकीय अटकळांना उधाण आले आहे. निवडणुकीपूर्वी भाजप अंतर्गत तणावाचा सामना करत आहे का?

Bharat Jadhav

  • भाजपने राज्यसभेसाठी ४ उमेदवारांची घोषणा केली, मात्र नवनीत राणा यांचे नाव नाही.

  • राणांच्या व्हॉट्सअप स्टेटसने राजकीय चर्चेला उधाण आले.

  • त्यांच्या प्रतिक्रियेचा अर्थ विविध पद्धतीने लावला जात आहे.

राज्यसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून 4 जागांसाठी भाजपने आपले उमेदवार जाहीर केले. मात्र या यादीत भाजपच्या फायर ब्रँड नेत्याचं नाव नाही. आपल्या भाषणाने विरोधकांना धारेवर धरणाऱ्या आणि कडवट हिंदूत्वाची भूमिका मांडणाऱ्या या नेत्या आहेत अमरावतीमधील माजी खासदार नवनीत राणा. नवनीत राणा यांना भाजपनं राज्यसभेची उमेदवारी दिली नाहीये. भाजपने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करताच नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी त्यातून अनेकांचे लक्ष वेधून घेतलंय.

नवनीत राणा यांनी एक व्हॉट्सअप स्टेटस ठेवलंय. हे स्टेट्स चर्चेचा विषय ठरलाय. 'संघर्ष करना मेरे लिये नई बात नही... मै किसी भी मोड से शुरुवात कर सकती हुं' असं त्यांनी आपल्या स्टेट्स मध्ये लिहिलंय. यासह त्यांनी एक व्हिडिओही अपलोड केला आहे. त्यामुळे नवनीत राणांच्या या व्हॉट्सअप स्टेटसची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. राणा त्यांच्या या स्टेटसमधून नेमकं काय सुचवू पाहत आहेत? असा प्रश्नही अनेकांनी उपस्थित केलाय.

राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपनं २५ नावांना संभाव्य यादीत स्थान दिलं. त्यात चार नेत्यांना प्रत्यक्षात राज्यसभेत स्थान देण्यात आलं. विदर्भातून नवनीत राणा यांना स्थान मिळेल, अशी बरीच चर्चा होती. मात्र राणांना यादीत स्थान मिळालं नाही. त्यात नवनवीत राणा यांनी व्हॉट्स अप स्टेटस ठेवल्यानं त्यामुळे त्या 'नवी सुरुवात' असं म्हटलं असल्यानं त्या नेमकं काय सुचवत आहेत हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. भाजपला त्या रामराम ठोकणार का अशी चर्चाही होतेय.

महाराष्ट्रातील ४ जागांसाठी भाजपने आपले उमेदवार जाहीर केलेत. यामध्ये रामदास आठवले, विनोद तावडे, माया चिंतामण ईवनाते आणि रामराव वडकुते यांना उमेदवारी मिळाली. महाराष्ट्रातील संख्याबळानुसार भाजपचे 4 उमेदवार हमखास निवडून येऊ शकतील. राज्यसभेच्या एकूण ३७ जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. त्याअंतर्गत भाजपने ९ उमेदवारांची घोषणा केली. महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला ४ जागा आल्या असून त्याच जागांवरील उमेदवार जाहीर करण्यात आलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor Death : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता काळाच्या पडद्याआड; कुटुंब बुडाले शोकसागरात

Shocking: कोल्हापूर हळहळलं! पोटच्या मुलासाठी २० वर्षे सोसल्या झळा, पण क्षणात सर्व संपलं; दुधाच्या पातेल्यात पडून चिमुरडीचा मृत्यू

जागा ५ अन् अर्ज ५००; भाजपचीच अग्निपरीक्षा, कोण होणार स्वीकृत नगरसेवक?

Maharashtra Live News Update: पुण्यासह राज्यात उन्हाचा तडाखा, सलग दोन दिवस कमाल तापमानाने पस्तीशी ओलांडली

Kalashtami 2026: यंदाच्या कालाष्टमीला 'शिव योगा'सोबत बनणार दुर्मिळ योग; पाहा कधी आहे शुभ मुहूर्त

SCROLL FOR NEXT