Rajyasabha Election SaamTV
महाराष्ट्र

आज राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान; सहाव्या जागेसाठी मोठी चुरस, निकालाकडे लक्ष

राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज म्हणजचे शुक्रवारी मतदान होणार आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : राज्यसभेच्या (Rajya Sabha Election) सहा जागांसाठी आज म्हणजचे शुक्रवारी मतदान होणार आहे. २४ वर्षानंतर राज्यात राज्यसभेच्या निवडणुकीत अशा प्रकारे मतदान होत असल्याने कमालीची चुरस निर्माण झाली आहे. या निवडणुकीत घोडेबाजार होणार असा आरोप सत्ताधाऱ्यांसह (Shivsena) विरोधकांनी (BJP) एकमेकांवर केला होता. त्यामुळे प्रत्येकाने आपआपले आमदार एका सुरक्षित ठिकाणी ठेवले होते. दरम्यान, या निवडणुकीत नेमका कोणता पक्ष बाजी मारणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Rajya Sabha Eection 2022 Latest Updates)

आज राज्यसभेच्या जागांसाठी सकाळी ९ ते ४ या वेळेत मतदान होणार आहे. तर संध्याकाळी ५ वाजेपासून मत मोजणीला सुरूवात होणार आहे. या निवडणुकीत विधानसभेचे निवडून आलेले लोकप्रतिनिधी मतदार असतात. मात्र एका आमदाराचं निधन झालं आहे. तर दुसरीकडे अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना कोर्टाने मतदानाचा अधिकार दिलेला नाही. त्यामुळे २८५ मतदार सहा जागांसाठी मतदान करतील.

राज्यसभा निवडणुकीत एक-एक आमदाराचं मत महत्वाचं ठरणार आहे. अशातच निवडणुकीत नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना न्यायालयाने मतदानाला परवानगी नाकारल्याने आघाडीचे दोन मतांचे गणित बिघडले आहे. दुसरीकडे या मतांची कमतरता ते अपक्ष आमदारांच्या मतदानावरून भरून काढतील अशी अपेक्षा होती. मात्र, हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाची तीन मते महाविकासआघाडीला मिळतील याबाबत सांशकता आहे.

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये चुरशीची लढत आहे. विजयासाठी पहिल्या पसंतीच्या उमेदवाराला ४१.०१ मतांची आवश्यकता आहे. अशातच अतिरिक्त उमेदवार निवडून आणण्यासाठी दोनही पक्षांना अपक्ष व छोट्या पक्षांची गरज लागणार आहे. अपक्ष व छोट्या पक्षांचे २९ आमदार असून, ते कोणती भूमिका घेतात यावर शिवसेना व भाजपचे भवितव्य अवलंबून आहे.

MIM च्या मतांना देखील प्रचंड महत्त्व

एमआयएम आणि शिवसेना यांची विचारसरणी वेगळी आहे. त्यामुळे एमआयएमचा शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा मिळणं कठीण आहे. त्यामुळे एमआयएमची दोन मतं काँग्रेस, राष्ट्रवादीला मिळतील आणि काँग्रेस, राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक आमदार शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करेल, असा तोडगा निघत असल्याचं दिसत आहे. यासाठी एक पत्रक काढलं जाईल. त्यात राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचं नाव असेल. मात्र शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचं नाव नसेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney problems: हे 1 साधं लक्षण दिसलं तर समजा लवकरच किडनी होणारे खराब, हळूहळू पोखरतं शरीर

Maharashtra News Live Update:नवीन पाणीपुरवठा योजनेत मनपावर ३०० कोटींचा अतिरिक्त भार; टप्पे कमी करण्याचे नियोजन

Petrol-Diesel Price Hike: CNG आणि LPG महागले! मग पेट्रोल-डीझेल स्वस्त की महाग? आजचे नवीन दर जारी, पाहा तुमच्या शहरातील भाव

India : भगवान शंकराचं अनोखं मंदिर! जेथे शिवलिंगावर अखंड पडत राहतं गंगाजल, जाणून घ्या कुठे आहे लोकेशन

Besan vs Milk for Face: चेहऱ्यासाठी बेसन की दूध, काय लावणे अधिक फायदेशीर आहे?

SCROLL FOR NEXT