Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Saam TV
महाराष्ट्र

मोठी बातमी! कॉग्रेस, राष्ट्रवादीने रणनीती बदलली, काय आहे नवा प्लान?

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाला (Rajya Sabha Election voting) सुरूवात झाली आहे. आतापर्यंत राज्यसभेसाठी 50 टक्के मतदान झालं आहे. अशातच मतदान सुरू असतानाच काँग्रेस (congress) आणि राष्ट्रवादीने (ncp) अचानक मतांचा कोटा वाढवला आहे. त्यामुळे शिवसेनेचा उमेदवार अडचणीत येण्याची शक्यता आहे. राज्यसभेत मतदान करण्यासाठी महाविकास आघाडीने नवा प्लॅन आखला होता. मात्र, अचानक राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने मतांचा कोटा 44 केल्याचे कळते. (Rajya Sabha Election 2022 Latest News)

मतांचं काय ठरलं होतं?

दरम्यान, राज्यसभेत मतदान करण्यासाठी आज सकाळी महाविकास आघाडीची रणनिती ठरली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात महाविकास आघाडीचे 42 आमदार मतदान करणार होते. यावेळी प्रत्येक उमेदवाराला 42 मते देण्याचं ठरलं होतं. मात्र, अचानक राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आपला मतांचा कोटा वाढवला आहे. हा कोटा 44 केला आहे. मतं बाद होऊन दगाफटका होऊ नये म्हणून ही खबरदारी घेण्यात आली आहे.

शिवसेनेनं वृत्त फेटाळलं

दुसरीकडे राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने आपल्या मतांचा कोटा वाढवला असल्याचं वृत्त शिवसेनेकडून फेटाळण्यात आलं आहे. कोणीही मतांचा कोटा वाढवला नाही. ही भाजपने पेरलेली बातमी आहे, असं खासदार विनायक राऊत यांनी सांगितलं. तर कोणी काही सांगू द्या. मतांचा कोटा वाढलेला नाही. संध्याकाळी महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी होतील, असं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईच्या रस्त्यावर रात्री थरार; चिकन तंदुरीवरून वाद उफाळला, तरूणाला रस्त्याच्या मधोमध संपवलं

Today's Marathi News Live : पंतप्रधान मोदींचा आज पुण्यात मुक्काम

Maharashtra Election: इंडिया आघाडीचं सरकार आलं तर कोण होणार पंतप्रधान? पटोलेंनी उघडं केलं गुपित

Aligarh News : मतदान करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला; नवरा-बायकोवर गुन्हा

ED, CBI तुमच्या हातातील बाहुले होते, मग तुम्ही 2014 ची निवडणूक का हारले; काँग्रेसच्या आरोपांवर PM मोदी संतापले

SCROLL FOR NEXT