मुंबई : आज राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज सकाळी ९ ते ४ या वेळेत मतदान होणार आहे. सहावी जागा जिंकण्यासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये चुरशीची लढत आहे. अतिरिक्त उमेदवार निवडून आणण्यासाठी दोनही पक्षांना अपक्ष व छोट्या पक्षांची गरज लागणार आहे. अशातच निवडणुकीच्या मतदानाला काही तास बाकी असतानाच असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. (Rajya Sabha Election 2022 Latest News)
एमआयएम राज्यसभेत कुणाला मतदान करणार हे आता स्पष्ट झालं आहे. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. 'एमआयएमचे दोन्ही आमदार काँग्रेसचे राज्यसभा उमेदवार इम्रान प्रतापगढी यांना मतदान करणार आहेत. आमच्याकडून त्यांना शुभेच्छा,' असं ट्वीट केलं आहे. इम्तियाज जलील यांनी केलं आहे.
आपल्या ट्विटमध्ये इम्तियाज जलील यांनी म्हटलं, "भाजपचा पराभव करायचा आहे. त्यासाठी आम्ही महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र महाविकास आघाडीत घटकपक्ष असलेल्या शिवसेनेसोबत आमचे राजकीय आणि तात्विक मतभेद कायम राहतील,' असं इम्तियाज जलील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
राज्यसभा निवडणुकीत एक-एक आमदाराचं मत महत्वाचं ठरणार आहे. अशातच निवडणुकीत नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना न्यायालयाने मतदानाला परवानगी नाकारल्याने आघाडीचे दोन मतांचे गणित बिघडले आहे. दुसरीकडे या मतांची कमतरता ते अपक्ष आमदारांच्या मतदानावरून भरून काढतील अशी अपेक्षा होती. मात्र, हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाची तीन मते महाविकासआघाडीला मिळतील याबाबत सांशकता आहे.
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये चुरशीची लढत आहे. विजयासाठी पहिल्या पसंतीच्या उमेदवाराला ४१.०१ मतांची आवश्यकता आहे. अशातच अतिरिक्त उमेदवार निवडून आणण्यासाठी दोनही पक्षांना अपक्ष व छोट्या पक्षांची गरज लागणार आहे. अपक्ष व छोट्या पक्षांचे २९ आमदार असून, ते कोणती भूमिका घेतात यावर शिवसेना व भाजपचे भवितव्य अवलंबून आहे.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.