Anil Deshmukh
Anil Deshmukh Saam Tv
महाराष्ट्र

महाविकास आघाडीला मोठा धक्का; अनिल देशमुखांची सुनावणी घेण्यास हायकोर्टाचा नकार

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाला (Rajya Sabha Election voting) सुरूवात झाली आहे. आतापर्यंत राज्यसभेसाठी 50 टक्के मतदान झालं आहे. अशातच हे मतदान सुरू झालेलं असतानाच राष्ट्रवादीला (NCP) मोठा झटका बसला आहे. अनिल देशमुखा (Anil Deshmukh) यांची सुनावणी घेण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांना राज्यसभेत मतदानाचा हक्क बजावता येणार नाही. (Nawab Malil And Anil Deshmukh Latest Marathi News)

दुसरीकडे देशमुख यांच्या पाठोपाठ मलिक यांनाही हायकोर्टाने तुर्तास दिलासा दिला नाहीये. लिकांची (Nawab Malik) याचिका चुकीची असल्याचं म्हटलं आहे. मंत्री नवाब मलिक यांची याचिका चुकीची असून, त्यांना मतदानाची तूर्तास परवानगी देता येणार नसल्याचे हायकोर्टाने स्पष्ट केलं आहे.

मात्र, असं असलं तरी, नवाब मलिक यांच्या वतीने याचिकेत सुधारणा करून पुन्हा याचिका दाखल करणार असल्याची माहिती मिळते आहे. याचिकेतील जामीनाचा मुद्दा काढून केवळ बंदोबस्तात मतदानाची परवानगी देण्याची मागणी मलिक यांच्याकडून करण्यात येणार आहे. या याचिकेवर आता थोड्यावेळात नव्या याचिकेसह पुन्हा सुनावणी होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: काँग्रेसच्या माजी नगरसेविका मीरा पाटील यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश

Abhishek Ghosalkar: हत्या प्रकरणात मोठी अपडेट; घटनेचे सर्व CCTV फुटेज कुटुंबियांना दाखवा: हायकोर्ट

Night Skin Care: मुलायम त्वचेसाठी रात्री झोपण्यापुर्वी करा 'या' गोष्टी

Sonalee Kulkarni : दुबईमध्ये उगवली शुक्राची चांदणी; साडीत खुललं अप्सरेचं सौंदर्य

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत भर; नायब राज्यपालांनी केली NIA द्वारे चौकशीची मागणी, काय आहे नेमकं प्रकरण?

SCROLL FOR NEXT