स्थानिकांच्या रोजगारासाठी मनसेच्या राजू उंबरकरांनी कंपनीत धडक देत दिला अल्टीमेटम संजय राठोड
महाराष्ट्र

स्थानिकांच्या रोजगारासाठी मनसेच्या राजू उंबरकरांनी कंपनीत धडक देत दिला अल्टीमेटम

वणी विभागात सामान्य माणसाच्या रोजगारावर मुजोर कंपनी धारकांकडून कुऱ्हाड मारली जात आहे. स्थानिक युवकांना कंपनीच्या कामावरून काढून टाकले जात आहे.

वृत्तसंस्था

संजय राठोड, यवतमाळ

यवतमाळ: वणी विभागात सामान्य माणसाच्या रोजगारावर मुजोर कंपनी धारकांकडून कुऱ्हाड मारली जात आहे. स्थानिक युवकांना कंपनीच्या कामावरून काढून टाकले जात आहे. या संपूर्ण घटनाक्रमाच्या संदर्भात मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्याकडे स्थानिक बेरोजगार युवकांनी आपली व्यथा मांडली. (Raju Umbarkar of MNS gave an ultimatum to the company for the employment of the locals)

हे देखील पहा -

स्थानिक युवकांनी रोजगार मिळवून देण्याची मागणी मनसेचे नेते राजू उंबरकर यांच्याकडे केली, तेव्हा राजू उंबरकर यांनी थेट कंपनीमध्ये चाल करून गौरव कंस्ट्रक्शन कंपनीच्या व्यवस्थापकाला चांगलेच धारेवर धरले. यावेळी मनसे स्टाईलने न्याय मिळवून देण्याची भाषा राजू उंबरकरांनी केली. वणी विभागात मोठ्या प्रमाणात गौण खनिजाचा मोठा साठा असताना आणि तितक्याच मोठ्या प्रमाणात गौण खनिजाचे उत्खननही चालू आहे. मात्र हजारो बेरोजगार युवकांच्या हाताला इथे काम मिळत नाहीय. सदरच्या कंपनीमध्ये स्थानिक बेरोजगारांना डावलून इतरत्र युवकांना काम दिल्या जात आहे आणि स्थानिकांना जाणीवपूर्वक डावलल्या जात आहे असा स्थानिक बेरोजगारांचा आरोप आरोप आहे.

हा प्रश्न वणी विभागात दिवसागणिक गंभीर होत चालला आहे. म्हणून स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार देण्याकरिता राजू उंबरकर यांनी सदर कंपनीमध्ये धडक देऊन निवेदन दिले व येत्या आठ दिवसात स्थानिकांना सामावून न घेतल्यास मनसे स्टाईल आंदोलन छेडू असा इशाराही दिला.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी PM मोदींचं नव्या खासदारांना आवाहन, म्हणाले...

Skin Care: तुम्ही त्वचेवर जास्त बॉडी लोशन लावता का? तर या समस्या होऊ शकतात

Maharashtra News Live Updates: विधानसभा निकालानंतर मनसेची चिंतन बैठक

Daulat Daroda News : शहापूर विधानसभेत पाचव्यांदा निवडून आलेल्या दौलत दरोडांनी व्यक्त केले आभार

Milind Gawali : अखेर प्रवास संपला! 'आई कुठे काय करते' फेम मिलिंद गवळींची भावुक पोस्ट, सेटवरील 'ही' गोष्ट घेऊन अनिरुद्ध पडला बाहेर

SCROLL FOR NEXT