Raju Shetty Shetkari Sanghatana Saam Digital
महाराष्ट्र

Raju Shetty Shetkari Sanghatana: 'चहा प्यायला पदरच्या ऊसाची साखर मिळेना'...शेतकरी महिलेने राजू शेट्टी यांच्यासमोर मांडली व्यथा

Raju Shetty Farmers Association: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांची आक्रोश यात्रा शाहूवाडी परिसरात असून या पदयात्रेदरम्यान एका महिलेने राजू शेट्टी यांच्यासमोर आपली व्यथा मांडली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Raju Shetty Shetkari Sanghatana

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांची कोल्हापूर जिल्ह्यात आक्रोश पदयात्रा सुरू आहे. सध्या ही आक्रोश यात्रा शाहूवाडी परिसरात असून या पदयात्रेदरम्यान एका महिलेने राजू शेट्टी यांच्यासमोर आपली व्यथा मांडली. अतिशय पोटतिडकीने या महिलेने आपल्या भावना त्यांच्यासमोर मांडल्या असून याचा व्हिडीओ सध्या महाराष्ट्रभर तुफान व्हायरल होत आहे.

चहा प्यायला पदरच्या उसाची साखर मिळेना. दुधाची अवस्था पण तशीच आहे. कर्ज मिळत नाही, अनुदान नाही, खर्च परवडत नाही. शेतकऱ्यांच्या पिकांना दर नसल्यामुळं शेतकऱ्यांनी जगायचं कसं. त्यामुळे उसाला दर मिळाला पाहिजे. शेती पिकांना हमीभाव मिळाला पाहिजे. त्यासाठी लढा तीव्र करुया. आम्ही तुमच्या मागे उभा राहतो. अशा आर्त भावना पोटतिडकीने या शेतकरी महिलेने खासदार राजू शेट्टींच्या समोर व्यक्त केल्या. ( साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मागील हंगामातील ४०० रुपये दिल्याशिवाय या हंगामात उसाच्या कांडालाही हात लावू देणार आहे, असा इशारा राजू शेट्टी साखर कारखान्यांना दिला आहे. त्यासाठी त्यांनी कोल्हापुरात आक्रोश यात्रा सुरू केली असून या आक्रोश यात्रेला शेतकऱ्यांचा पाठिंबा वाढत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: गडचिरोलीत ‘ट्रॅक्टर टेक’ कौशल्य विकास कार्यक्रम सुरू होणार, महिंद्रा अँड महिंद्रा व राज्य शासनाचा सामंजस्य करार

Jamner News : सासू, सासरे व पत्नीचा त्रास; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला! दिल्ली, मुंबईसह ठिकठिकाणी छापेमारी, बॉम्बब्लास्टची होती प्लानिंग?

Flipkart BBD Sale: मोबाईलप्रेमींसाठी आनंदाची बातमी ! Google Pixel 9 वर बंपर ऑफर, जाणून घ्या किंमत

Mrunal Dusanis: 'लग्नानंतर होईलच प्रेम' फेम मृणाल दुसानिस सध्या काय करते? तुम्हाला माहितीये का

SCROLL FOR NEXT