raju shetti opposes ratnagiri nagpur highway Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur Goa Shaktipeeth Expressway: शेतक-यांना चौपट मोबदला द्या, अन्यथा भूसंपादन करू देणार नाही; राजू शेट्टींचा इशारा

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

रत्नागिरी - नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या कोल्हापूर जिल्ह्यातील चोकाक ते अंकली या महामार्गातील शेतक-यांना चौपट मोबदला मिळाल्याशिवाय भुसंपादन करू देणार नाही, याबाबतीत शासनाने आपली भुमिका स्पष्ट करावी मगच मोजणीबाबत कार्यवाही करावी अशी ठाम भुमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी घेतली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत राजू शेट्टी यांनी आपली भूमिका मांडली.

शेट्टी म्हणाले विकास कामांना शेतक-यांचा विरोध नाही मात्र शेतक-यांची थडगी बांधून विकास करता येणार नाही. प्रशासन व सरकार दोघेही वेळकाढूपणा करू लागल्याने हा प्रकल्प रखडू लागला आहे. महाविकास आघाडी सरकारने भुसंपादन कायदा बदलला यामुळे शेतक-यांच्यी राखरांगोळी झाली.

राजू शेट्टी पुढं बाेलताना म्हणाले शेतकरी वारवांर चौपट मोबदल्यासाठी हेलपाटे मारूनही याबाबत शासनाकडून कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. प्रशासनाकडून जबरदस्ती पोलिस बळाचा वापर करून मोजणीबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांचेकडून कार्यवाही करण्यात येत आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jammu Kashmir Exit Polls : जम्मू-काश्मीरमध्ये येणार 'इंडिया आघाडी'चं सरकार, भाजपला बसणार धक्का? जाणून घ्या EXIT POLL चा अंदाज

Marathi News Live Updates :हरियाणात १० वर्षांनंतर काँग्रेस रिटर्न, जम्मूत भाजपची सत्ता; एक्झिट पोलचे आकडे आले

Navratri 2024: देवीला दाखवा हा नैवेद्य; इच्छा होतील पूर्ण

Haryana Election Exit Poll : हरियाणात १० वर्षांनंतर काँग्रेसचं सरकार? भाजपची हॅट्ट्रिक हुकणार, जाणून घ्या Exit Poll चे अंदाज

VIDEO : राज ठाकरे आपल्याच कार्यकर्त्यांवर संतापले; पाहा काय आहे कारण

SCROLL FOR NEXT