Shaktipeeth Expressway : नागपूर - गोवा ८०५ किमी लांबीच्या शक्तिपीठ महामार्गाच्या निर्मितीसाठी होणाऱ्या भूसंपादनाचा विरोध वाढतच चाललाय. माजी खासदार राजू शेट्टी यांनीही शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला विरोध दर्शवला आहे. रक्ताचे पाट वाहतील पण भू संपादन होऊ देणार नाही, अशी भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली आहे. ते पुण्यात बोलत होते. तिसऱ्या आघाडीची आज पुण्यात बैठक होणार आहे. त्यासाठी राजू शेट्टी पुण्यात आले होते, त्यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीका केली.
शक्तीपीठाला स्थगिती देण्याचा घोषणा झाल्या. एकूण खर्च, डीपीआर काय? हे समजून घेण्यासाठी पत्र दिलं होतं. त्याचं उत्तर त्यांनी दिलं, त्यात ते म्हणाले ८६ हजार कोटी खर्च येणार आहे. पत्रात म्हटलं की समृद्धी प्रमाणे मोबदला देण्याचं प्रस्तावित आहे पण स्पष्टता नाही. केवळ प्रस्थापित आहे असं म्हणून शेतकऱ्यांची फसवणूक होवू देणार नाही. रक्ताचे पाट वाहतील पण भूसंपादन होवू देणार नाही, असे राजू शेट्टी म्हणाले.
एक देश एक निवडणूक या निर्णयावर आमचा विश्वास नाही. २०२९ नंतर याची आंबल बजावणी करावी लागेल. लोकसभा झाल्या आणि ४ महिन्यांनंतर सरकार कोसळलं तर निवडणुका परत घेणार का? ही ब्रह्मिक कल्पना आहे, हा विषय व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीमध्ये चालणारा आहे, असा टोला राजू शेट्टी यांनी लगावला.
कधी निवडणुका होणार हे निवडणूक आयोग मुख्यमंत्री यांच्या कानात बोलले. नोव्हेंबरमधील २,३ आठवड्यामध्ये होतील असा अंदाज आहे, असे राजू शेट्टी म्हणाले.
युती-आघाडीवर टीका
शेतकरी चळवळीमधील सर्वांनी सगळ्यांनी एकत्र यावे असं आम्ही ठरवलं आहे. अतिवृष्टीचा दौरा देखील आम्ही एकत्रपणे केला. अजून पुढे गेलं पाहिजे यासाठी आजची बैठक केली जाईल. आघाडी आणि युती सरकार आम्ही बघितली पण याच काळात अनेक सामाजिक प्रश्न निर्माण झाले. सर्वाधिक बेरोजगारी महाराष्ट्रात आहेत, गरिबी वाढतेय. एक चांगलं शासन आम्हाला मिळालं नाही असं आम्हाला वाटतं आहे, असे राजू शेट्टी म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.