Raju Patil News Saam tv
महाराष्ट्र

Raju Patil News: कल्याण डोंबिवलीला निसर्गावर सोडलंय, पालिका ऑटो मोडवर; रस्त्यावरील खड्ड्यांवरून आमदार राजू पाटील यांची टीका

अधिकाऱ्यांनी कल्याण डोंबिवलीला निसर्गावर सोडलंय, पालिका ऑटो मोडवर सुरु आहे, अशी टीका मनसे आमदार राजू पाटील यांनी केली.

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख

Raju Patil News: 'खड्डे भरण्याच्या कामात ४० टक्के लाच घेतली जाते. ठाण्याचे आयुक्त चांगलं काम करतात. मात्र येथील अधिकाऱ्यांनी कल्याण डोंबिवलीला निसर्गावर सोडलंय, पालिका ऑटो मोडवर सुरु आहे, अशी टीका मनसे आमदार राजू पाटील यांनी केली. (Latest Marathi News)

कल्याण डोंबिवली शहरात रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा बळी गेला आहे. खड्डे भरण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झाल्याचा दावा महापालिकडून केला जात आहे. मात्र, हे काम संथ गतीने सुरू आहे. याचा नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. यावरून मनसे आमदार राजू पाटील यांनी जोरदार टीका केली आहे.

राजू पाटील म्हणाले, 'दरवर्षी खड्डे भरण्यासाठी टेंडर काढले जातात.४० टक्के रस्त्याच्या कामात लाच घेतली जाते. त्यामुळे ठेकेदारावर नियंत्रण नाही. कामात दर्जा नाही. कोणतेही अद्यावत यंत्रणा पालिकेकडे नाही.इच्छा शक्तीचा भाग आहे'.

'ठाण्याचे आयुक्त चांगले आहेत, नवी मुंबईत देखील त्यांनी चांगलं काम केलं, मात्र, कल्याण डोंबिवलीला निसर्गावर सोडून दिले आहे. महापालिका ऑटो मोडवर चालली आहे.कुणाचा कुणाला मागमूस नाही, अशी टीका मनसे आमदार राजू पाटील यांनी केली.

डोंबिवली माणकोली पुलाच्या कामावरून राजू पाटील यांची टीका

दरम्यान, निवडणुकीच्या तोंडावर मोठा गाव माणकोली पूल खुला करतील. मात्र पुलाला जोडणारे रस्ते तयार नसल्याने डोंबिवलीकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे, अशी टीका मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे. मनसे आमदार राजू पाटील यांनी डोंबिवली माणकोली पूलाची माणकोली बाजूने पाहणी केली. यावेळे ते बोलत होते.

'माणकोली पूल तयार झाला तरी पुलाला येण्या-जाण्याचे डोंबिबली मोठागाव तसेच माणकोलीचे रस्ते अजून तयार नाही. याचे नियोजन नाही. हे रस्ते आधीच तयार करणे गरजेचे होते. निवडणुकाच्या तोंडापर्यंत हे काम खेचायचे आहे, असा आरोप आमदार पाटील यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मरीन ड्राईव्हवर पहाटे भीषण अपघात, ज्येष्ठ नागरिकासह तिघांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: मरीन ड्राइव्हवर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू

विधानपरिषदेच्या निवडणुकीमुळे राजकीय घडामोडींना वेग; राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणाला संधी मिळणार? ४ जणांची नावे चर्चेत

Pune : पुण्यात चाललंय काय? महिला पोलीस अधिकाऱ्याचा सासरच्या मंडळीकडून छळ अन् मारहाण, ६ जणांविरुद्ध गुन्हा

Aloe Vera And Coconut Oil Hair Mask: कोरफडमध्ये 'हे' तेल मिक्स करून लावा, केस होतील सिल्की आणि शायनी

SCROLL FOR NEXT