rajapur citizens opposed green refinery project, Konkan News, Ratnagiri News saam tv
महाराष्ट्र

भाजपाचा दावा ठरला फाेल; ग्रीन रिफायनरी प्रकल्प विराेधात शिवणे खुर्द गावात आंदाेलन सुरु

शासन, स्थानिक प्रशासन विश्वासात न घेता रिफायनरी संबंधित काम करत असल्याचा आराेप नागरिकांनी साम टीव्हीशी बाेलताना केला.

अमोल कलये

रत्नागिरी : कोकणातील (kokan) ग्रीन रिफायनरी प्रकल्पास (refinery project) नागरिकांचा विरोध वाढू लागला आहे. राजापूर (rajapur) तालुक्यातील शिवणे खुर्द गावात माती परीक्षण, ड्रोन सर्व्हेला स्थानिकांनी विरोध दर्शविला आहे. बुधवारी दुपार पासून येथील नागरिकांनी त्यासाठी ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. (Green refinery project latest Marathi news)

राजापूर (rajapur) तालुक्यात धोपेश्वर, बारसू, गोवळ परिसरात प्रस्तावित असलेल्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पासाठी संबधीत कंपनीकडून आता प्राथमिक स्वरूपात प्रकल्पस्थळी माती सर्वेक्षण करणे व अन्य कामे हाती घेण्यात आली आहेत. या प्रकल्पास स्थानिकांचा विरोध नसल्याचा दावा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर, पंढरीनाथ आंबेरकर यांनी केला हाेता.

दरम्यान राजापूर तालुक्यातील शिवणे खुर्द गावात माती परीक्षण, ड्रोन सर्व्हेला नागरिकांचा विरोध वाढला आहे. बुधवारी दुपारपासून सुरु झालेले ठिय्या आंदोलन आजही नागरिकांनी सुरु ठेवले आहे. स्थानिक नागरिकांनी काळ्या कुट्ट अंधारात उघड्या माळरानावर आंदोलनाचा पवित्रा घेतला. या आंदाेलनात शेकडो महिला, पुरुष, तरुण, वृद्ध मध्यरात्री देखील सहभागी झाले हाेते. पाऊस, थंडी, वारा याची तमा न बाळगता मोठ्या प्रमाणात स्थानिकांनी ठिय्या मांडला आहे. शासन, प्रशासन ठोस उत्तर देत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही अशी भुमिका नागरिकांनी घेतली आहे. शासन, स्थानिक प्रशासन विश्वासात न घेता रिफायनरी संबंधित काम करत असल्याचा आराेप नागरिकांनी साम टीव्हीशी बाेलताना केला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपूरपर्यंत जाऊन पोहोचली

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून दर महिन्याला मिळवा ५५०० रुपये

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

SCROLL FOR NEXT