- विनायक वंजारे
सिंधुदुर्ग : आमदार नितेश राणे (nitesh rane) यांना सहा फेब्रुवारी पर्यंत दिलासा असताना जिल्हा न्यायालयाबाहेर (sindhudurg court) त्यांना अडवून पोलिसांनी (sindhudurg police) गुन्हा केला होता. असं असताना पोलिसांनी (police) उलट निलेश राणे (nilesh rane) यांच्यासह भाजप (bjp) कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत असा आराेप भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली (rajan teli) यांनी आज (गुरुवार) येथे पत्रकार परिषदेत केला. (nitesh rane latest marathi news). तेली यांचा कुडाळचे आमदार वैभव नाईक यांच्यावर देखील राेख हाेता.
तेली म्हणाले जिल्हा पोलीस अधीक्षक कोणाच्या तरी दबावाखाली येऊन भाजप (bjp) विरोधात वागत आहेत. आम्ही हे सहन करणार नाही. येत्या दोन दिवसांत जिल्हा कार्यकारिणी बैठक घेऊन या विरोधात आंदोलन करण्याची दिशा ठरविणार आहोत असा इशारा देखील राजन तेली यांनी दिला.
दरम्यान भाजप शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांची भेट घेऊन त्यांना याबाबत निवेदन दिले. एक फेब्रवारीला जिल्हा न्यायालयाबाहेर (nitesh rane) घडलेल्या घटनेनंतर पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले होते. त्याचा निषेध करण्यासाठी जिल्हाध्यक्ष राजन तेली व शिष्टमंडळ आज जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांना भेटले. यावेळी जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी आमदार अजित गोगटे उपस्थित होते.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.