Sindhudurg: 'पाेलिस आम्हांला अटक करु शकणार नाही ही सिंहगर्जना, कांगावा कूठं लुप्त झाला'

आज आमदार नितेश राणे हे न्यायालयास शरण आले आहेत.
pradeep gharat on nitesh rane
pradeep gharat on nitesh ranesaam tv
Published On

- विनायक वंजारे

सिंधुदुर्ग : शिवसैनिक संताेष परब (santosh parab) हल्ला प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) हे आज न्यायालयात शरण आले. सिंधूदुर्ग न्यायालयात (sindhudurg court) आत्ता राणेंना न्यायालयीन काेठडी सुनावली आहे. दरम्यान विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी काल पर्यंत सिंहगर्जना करणारे राणेंचे आज संबंधित न्यायालयात हजर हाेणं हे त्यांच्या सांगण्याप्रमाणे बेकायदेशिर ठरेल असं साम टीव्हीशी बाेलताना नमूद केले. घरत म्हणाले काल त्यांनी सिंहगर्जना केली हाेती. आम्ही उच्च न्यायालयात जाऊ वगैरे. पाेलिस आम्हांला अटक करु शकणार नाही वगैरे ही आज त्यांची गर्जना, कांगावा कूठ लुप्त झाला. ही बाब सामान्य लाेकांना समजून येत आहे. ही विचार करण्यासारखी गाेष्ट आहे. (nitesh rane latest marathi news)

pradeep gharat on nitesh rane
BJP MLA Nitesh Rane : राणेंना न्यायालयीन काेठडी; न्यायालयात जाण्यापुर्वीच नितेश झाले हाेते मवाळ

सध्या न्यायालयात (court) सरकारी वकील घरत हे युक्तीवाद करीत आहेत. नितेश राणेंना (nitesh rane) दहा दिवसांची पाेलिस काेठडी द्यावी अशी मागणी घरत यांनी केली आहे. न्यायालयाने दहा दिवसांची पाेलिस काेठडी (police custody) कशासाठी असा प्रश्न विचारला आहे. याबाबत घरत हे त्यांचे लेखी म्हणणे देणार आहेत. (nitesh rane latest news)

दरम्यान नितेश राणे कणकवलीतील (kankavali) दिवाणी न्यायालयात हजर झाल्यानंतर गेले दोन तास कोर्टामधे युक्तिवाद सुरू आहे. न्यायालयाने नितेश राणेंना न्यायालयीन कोठडी दिल्या नंतर विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी यावर आक्षेप घेत नितेश राणेंना दहा दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केलीय. न्यायालय नेमका निर्णय काय देत हे पहाव लागणार आहे. नितेश राणेंच्या अटकेच्या शक्यतेमुळे कणकवली न्यायालयाच्या बाहेर तणावपूर्ण वातावरण असून पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे. (nitesh rane bail application latest updates)

Edited By : Siddharth Latkar

pradeep gharat on nitesh rane
GATE 2022: गेट परीक्षा पुढं ढकला; याचिकेवर उद्या सर्वाेच्च न्यायालयात सुनावणी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com