Shivsena Saam Tv News
महाराष्ट्र

Vinayak Raut on Rajan Salvi: 'साळवी यांचा पराभव माझ्यामुळे की त्यांच्या कर्मामुळे हे त्यांनी ओळखावं', विनायक राऊतांचं सडेतोड प्रत्युत्तर

Rajan Salvi: विनायक राऊत हे विधानसभेतील निवडणुकीतील पराभवाला कारणीभूत असल्याचं सांगत साळवी यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम ठोकलाय. राजन साळवींच्या आरोपांवर विनायक राऊत यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.

Bhagyashree Kamble

माजी आमदार राजन साळवी यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच पेटलंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत साळवी यांनी धनुष्यबाण हाती घेतलाय. ठाकरे गटाला धक्का देत त्यांनी बुधवारी उपनेते पदाचा राजीनामा दिला, तसेच त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेची वाट धरली.

माजी खासदार विनायक राऊत हे विधानसभेतील निवडणुकीतील पराभवाला कारणीभूत असल्याचं सांगत साळवी यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम ठोकला आहे. राजन साळवींच्या आरोपांवर माजी खासदार विनायक राऊत यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.

'जर माझ्यामुळे राजन साळवी यांचा पराभव होत असेल तर, याचा अर्थ साळवी त्या मतदारसंघात निवडणूक लढण्यास पात्र नव्हते. त्यांचा पराभव दिसत असताना त्यांनी उमेदवारी हट्टाने घेतली होती. साळवी यांचा पराभव माझ्यामुळे की त्यांच्या कर्मामुळे हे त्यांनी ओळखावं', असा हल्लोबोल राजन साळवी यांनी केला आहे.

तसेच विनायक राऊत यांनी राजन साळवी यांच्यावर गंभीर आरोप देखील केले आहेत. 'रिफायनरीची दलाली करायची, प्रत्येक कामात ठेकेदारी, टक्केवारी घ्यायची, असं काम राजन साळवी यांचं सुरू होतं. जे काही पाप त्यांनी केले होते. त्या पापांची फळं या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना मिळाली' असल्याचंही विनायक राऊत म्हणाले.

'रामदास कदम यांची आम्ही फार किंमत करत नाही. उदय सामंत यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चाललेली जवळीक पाहता एकनाथ शिंदे यांना आता भीती वाटू लागली आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांनी राजन साळवी यांना जवळ केलं', असा दावाही विनायक राऊत यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबई पावसाने ठप्प : सांताक्रूझमध्ये रस्ते पाण्याखाली, वाहनचालकांची मोठी तारांबळ|VIDEO

Maharashtra Live News Update: रायगडात पावसाचा ऑरेंज अलर्ट

Nanded News: छाती इतक्या पाण्यातून बैलगाडीतून जीवघेणा प्रवास, नांदेडमध्ये शेतकर्‍यांवर अस्मानी संकट, पाहा व्हिडिओ

Shocking News : पुणे हादरलं! अल्पवयीन मुलाकडून आईच्या प्रियकराची हत्या

ED Raid : काँग्रेस आमदाराच्या घरी ईडीची छापेमारी, कोट्यवधीचे घबाड मिळालं, ६.७ किलो सोनं जप्त

SCROLL FOR NEXT