नाशिक रेल्वे स्थानकांत ज्यांच्यावर फुलांचा वर्षाव झाला.. जोरदार घोषणाबाजीत ज्यांचे स्वागत झालं.. त्यांची प्रत्येक रियाक्शन टिपण्यासाठी प्रवाशांसह मिडीयाचे कॅमेरे रोखले गेले ते कोणी मंत्रीपद घेऊन आलेले मंत्री नव्हते तर ते होते महाराष्ट्राच्या राजकारणात निष्ठेचा वस्तुपाठ घालून देणारे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे. संपूर्ण महाराष्ट्रात एका बाजूला शिवसेना पुन्हा फुटल्याची चर्चा असताना, त्याहूनही जास्त चर्चा रंगलीये ती राजाभाऊ वाजेंच्या या अभेद्य निष्ठेची. आणि त्यामुळे पक्षातली फुट राजाभाऊच्या डोळ्यात अश्रु आणून गेल्याचं उभ्या महाराष्ट्रानं पाहिलं.
२०२२ च्या बंडानंतर खिळखिळ्या झालेल्या पक्षात आपले कोण आणि परके कोण याची निवड करतांना उध्दव ठाकरेंनी राजाभाऊ वाझेंना नाशिक लोकसभेच्या निवडणुकीत उतरवलं. २ टर्म खासदार असलेल्या हेंमत गोडसेंच्या विरोधात राजाभाऊ वाझेंनी आपली ताकद लावली आणि उद्धव ठाकरेंचा विश्वास सार्थकी लावला. हा विश्वास फक्त निवडणूकीत जिंकण्यापुरता नव्हता तर जेव्हा पक्षाला त्यांची गरज लागली त्यावेळी त्यांनी पक्षासाठी १०० कोटींच्या ऑफरला झुगारुन लावत ऑपरेशन टायगरचं बिंगही फोडलं...
सध्या राजकारणात कधी काय होईल कोण कोणत्या पक्षात जाईल याचा काही नेम नाही. सत्तेत राहण्यासाठी वडील एका पक्षात मुलगा एका पक्षात, तर नवरा आणि बायको वेगवेगळ्या पक्षात असा सगळा राजकारणाचा विचका झालाय. त्यात राजाभाऊ वाझेंनी घेतलेल्या या भूमिकेनं महाराष्ट्राला निष्ठेचं दर्शन झालं. कारण आज फुटीर खासदारांना 10-15 पोलिसांच्या कड्यामध्ये आणि सुरक्षेच्या सावटात तोंड लपवून फिरावं लागत असताना, दुसरीकडे राजाभाऊ वाझेंवर होणारी ही फुलांची उधळण ओरडून ओरडून सांगतेय की, राजकारणात पैशापेक्षा, पदापेक्षा आणि सत्तेपेक्षा पक्षनिष्ठा कैक पटीनं मोठी आहे...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.