Raj Thackeray and Uddhav Thackeray alliance talks detailed analysis Saam Tv
महाराष्ट्र

बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी राज–उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र! युतीची पायाभरणी?

Raj Thackeray and Uddhav Thackeray Reunite: अखेर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीची बोलणी सुरु झाल्याची चर्चा रंगलीय... मात्र ही चर्चा रंगण्यामागचं नेमकं कारण काय? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कुठं एकत्र आले?

Bharat Mohalkar

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तब्बल 11 वर्षानंतर बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर एकत्र आलेत.. आणि त्याला कारण ठरलंय... बाळासाहेब ठाकरेंचा स्मृतीदिन..... आधी उद्धव ठाकरे आणि त्यानंतर राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर अभिवादन केलं... आणि दोन्ही भावांनी एकत्र येत चर्चाही केलीय.. त्यामुळे मनसे आणि ठाकरेसेनेच्या युतीवर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा रंगलीय...

आधी हिंदीसक्तीच्या आणि त्यानंतर व्होटचोरीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र आले होते.. मात्र या राजकीय भूमिकांच्या मध्ये कौटुंबिक पूल सांधला जावा यासाठी राज ठाकरेंच्या आईच्या तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी, भाऊबीजेसाठी एवढंच नव्हे तर कौटुंबिक कार्यक्रमासाठीही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेत... पाहूयात त्यांच्या भेटीगाठीची मालिका....

5 जुलै- मराठीच्या विजयी मेळाव्यात एकत्र

27 जुलै- उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भेट

27 ऑगस्ट- शिवतीर्थवर उद्धव ठाकरेंची कौटुंबिक भेट

10 सप्टेंबर- राऊतांसह शिवतीर्थवर राजकीय चर्चा

6 ऑक्टोबर- संजय राऊतांच्या कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र

12 ऑक्टोबर- मातोश्रीवर ठाकरे बंधूंचं स्नेहभोजन

14 ऑक्टोबर- निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी एकत्र

15 ऑक्टोबर- यशवंतराव चव्हाण सेंटरला एकत्र पत्रकार परिषद

17 ऑक्टोबर - मनसेच्या दिपोत्सवाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्धाटन

1 नोव्हेंबर- सत्याच्या मोर्चात एकत्र सहभाग

अवघ्या 5 महिन्यात राज ठाकरे उद्धव ठाकरे 12 वेळा एकत्र आलेत... त्यातच आता बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर अभिवादनानंतर बाळासाहेब ठाकरेंच्या साक्षीने युतीबाबत चर्चा केल्याची माहिती समोर आलीय.. त्यामुळे मुंबई महापालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे युतीची अधिकृत घोषणा कधी करणार? याबरोबरच कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीसाठी किती वेळ मिळणार... यावर मुंबई महापालिकेच्या सत्तेचं समीकरण अवलंबून असणार आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Deepika Padukone : चाहत्याच्या आईने पुरणपोळी आणली अन् दीपिकाने थेट...; VIDEO मधील साधेपणा पाहून नेटकरी भारावले

Maharashtra Live News Update: आज पुण्यात अजित पवारांचा रोड शो

Nashik Politics: मोठी बातमी! नाशिकमध्ये भाजपला मोठं खिंडार, एकनाथ शिंदेंनी ३ बडे नेते फोडले

Government Job: सरकारी कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी; मिळणार लाखो रुपये पगार; पात्रता काय? वाचा सविस्तर

Gold Rate Today: सोन्याची किंमतीत वाढ की घसरण? वाचा २२ आणि २४ कॅरेटचा आजचा दर

SCROLL FOR NEXT