Raj Thackeray यांनी परप्रांतीयांबाबत केलेली 'ती' मागणी मान्य
Raj Thackeray यांनी परप्रांतीयांबाबत केलेली 'ती' मागणी मान्य  
महाराष्ट्र

Raj Thackeray यांनी परप्रांतीयांबाबत केलेली 'ती' मागणी मान्य

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

''माता भगिनींची टिंगल टवाळी खपवून घेतली जाणार नाही. महिला सुरक्षित (Womens Safty) राहिल्याच पाहिजेत, त्यांच्यासुरक्षेसाठी जे करता येईल ते करा, अशा उपाय योजनांबद्दल कोणतीही तडजोड केली जाणार नाही,'' अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM uddhav Thackeray) यांनी गृहविभागाला (Ministry of Home Affairs) सुचना केल्या आहेत. तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी गृहविभागाला पुर्ण पाठबळ दिले जाईल. महिलांवर अत्याचार (Atrocities against women) करणाऱ्या नराधमांवर वचक बासावा यासाठी प्रयत्न करा. असा आदेशही त्यांनी यावेळी दिला. या बैठकीस गृहमंत्री दिलीप वळसेपाटील, पोलिस महासंचालक संजय पांडे उपस्थित होते.

हे देखील पहा-

- राज ठाकरेंची मागणी मान्य

मुंबईत गेल्या आठवड्यात झालेल्या साकीनाका प्रकरणानंतर राज्यातील महिलांच्या सुरक्षेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल गृहविभागाची महत्त्वाची बैठक घेतली. यावेळी त्यांनी गृहविभागाला अनेक महत्त्वाच्या सुचना केल्या. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी, काही महिन्यांपुर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील परप्रांतीयांहबद्दल ज्या सुचना केल्या होत्या, त्या सुचनाही मान्य केल्या आहेत.

गेल्या वर्षी लॉकडाऊन लागल्यानंतर लाखो परप्रांतीय आपल्या गावी परत गेले होते. त्यावेळीही राज ठाकरेंनी या मागणीचा पुनरुच्चार केला होता. लॉकडाऊनमध्ये लाखो परप्रांतीय आपापल्या गावी गेलेत. पण लॉकडाऊन उघडल्यानंतर, परिस्थिती पुर्ववत झाली की, हे परप्रांतीय पुन्हा महाराष्ट्रात येतील त्यावेळी त्यांची नोंद ठेवा, अशी मागणी त्यांनी केली होती.

या मागणीच्या पार्श्वभुमीवर आणि महाराष्ट्रात परराज्यातून आलेल्या परप्रांतीयांचा गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभाग पाहता मुख्यमंत्र्यांनी याबद्दलही पोलीस अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सुचना दिल्यात. '' इतर राज्यातून आलेल्याची नोंद ठेवावी लागेल, ते येतात कुठून जातात कुठे याची माहिती ठेवा. असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यामुळे आता महाराष्ट्रात येणाऱ्या परप्रांतीयांची नोंद ठेवली जाणार आहे.

-शक्ती कायद्यातही सुधारणा करण्यावर भर देणार

तसेच, जलदगती न्यायालयांतून निकाल लागतो. पण शिक्षेच्या अंमलबजावणीबाबत आणि पुढील न्यायालयीन प्रक्रियेबाबत सुधारणा करण्याचे प्रयत्न व्हावेत, असेही त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर, शक्ती कायद्यातही सुधारणा करण्यावर भर दिला जाईल. महिला पोलीसांनी पीडीत महिलांशी विश्वासाने बोलून माहिती घ्यावी. त्यांच्या छोट्या तक्रारींकडेही दुर्लक्ष होऊ नये. असा सक्तीचा आदेशही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिला.

इतकेच नव्हे तर, गुन्ह्यात रिक्षांचा वापर होत असल्याने रिक्षांच्या अनधिकृत हस्तांतरणाला पायबंद घालून नोंदणी करताना, स्थानिक पोलिसांकडे माहिती देणे परवानाधारकाला बंधनकारक करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी या बैठकी दरम्यान दिले आहेत.

Edited By- Anuradha

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मस्ती केली, चांगलीच जिरली! भररस्त्यात तरुण खुर्ची टाकून बसला; पुढं जे घडलं ते... धक्कादायक VIDEO

शिर्डीतील साईनाथ रुग्णालयात डायलिसिस सुविधा मिळणार मोफत, साई भक्ताकडून 24 लाखाच्या मशीनची देणगी

Today's Marathi News Live : नरेंद्र मोदींची पुण्यात सभा, अमित ठाकरे सभेसाठी रवाना

Mumbai Local News Today: लोकलचा डबा रुळावरुन घसरला! कुठे? कधी? कसा? हार्बर लाईनने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी

PM मोदींच्या सभेने काही फरक पडणार नाही, कोल्हापुरकरांचा निर्णय पक्का; मालोजीराजे छत्रपतींना विश्वास, Video

SCROLL FOR NEXT