Raj Thackeray News Saam Tv
महाराष्ट्र

Nashik News : राज ठाकरेंचे बॅनर्स फाडले; नाशिकच्या काळाराम मंदिर परिसरातील प्रकार

Raj Thackeray News : राज ठाकरे उद्या काळाराम मंदिराला भेट देणार आहेत. त्यानिमित्त काळाराम मंदिर परिसरात राज ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर्स लावण्यात आले होते.

अभिजीत सोनावणे

Nashik News :

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी ठिकाठिकाणी बॅनर्स लावण्यात आले आहेत. काळाराम मंदिर परिसरात राज ठाकरे यांचे लावलेले बॅनर्स फाडण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

राज ठाकरे उद्या काळाराम मंदिराला भेट देणार आहेत. त्यानिमित्त काळाराम मंदिर परिसरात राज ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर्स लावण्यात आले होते. रात्रीच्या वेळी अज्ञातांनी हे बॅनर्स फाडले आहे.

मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे आजपासून तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. आज सायंकाळी राज ठाकरे नाशकात दाखल होणार आहेत. उद्या महाशिवरात्रीला नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात राज ठाकरे श्रीरामाचे दर्शन आणि आरती करणार आहेत. नाशिक शहरातील विविध शाखांचे करणार उद्घाटन तसेच भेटी देणार आहेत.

उद्या राज ठाकरे यांच्या उपस्थितीत राज्यातील पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक होणार आहे. तर ९ तारखेला नाशिकच्या दादासाहेब गायकवाड सभागृहात मनसेचा १८ वा वर्धापन दिन साजरा होणार आहे.

या वर्धापनदिनाच्या निमित्ताने राज ठाकरे राज्यातील पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार आहेत. आगामी लोकसभेचं रणशिग राज ठाकरे नाशिकमधून फुंकणार का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Antilia Bomb Scare Case: सचिन वाझे आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यावर ५ वर्षांनी आरोप निश्चित

क्षणाचाही विलंब करणार नाही; मंत्री भरत गोगावले यांची राजीनाम्याची तयारी, राजकारणात खळबळ

Jhimma 3: पुन्हा जमणार मैत्रिणींची भन्नाट ट्रिप! 'झिम्मा ३'च्या शूटिंगला सुरुवात

कॉक्रोच जनता पार्टीच्या अडचणी वाढणार? विदेशी फंडिंग ईडीकडून चौकशी सुरू, गृहराज्यमंत्र्यांची माहिती

Maharashtra News Live: रायगडच्या खारपाडा टोल नाक्यावर, मनसे कार्यकर्त्यांचा राडा

SCROLL FOR NEXT