राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना पक्ष वाढीसाठी उपदेश; भाषणात सांगितला बाळासाहेबांचा किस्सा!
राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना पक्ष वाढीसाठी उपदेश; भाषणात सांगितला बाळासाहेबांचा किस्सा! SaamTV
महाराष्ट्र

राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना पक्ष वाढीसाठी उपदेश; भाषणात सांगितला बाळासाहेबांचा किस्सा!

अभिजीत सोनावणे, सामटीव्ही नाशिक

नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आज नाशिक (Nashik) दौऱ्यावर आले आहेत त्यांनी यावेळी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधीत केलं आहे त्यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत कार्यकर्त्यांचे आणि नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे कान चांगलेच टोचले आहेत. शिवाय पक्ष वाढीसाठी त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या वडीलांचा किस्सा ही कार्यकर्त्यांना सांगितला आहे. (Raj Thackeray's advice to party workers for party growth)

हे देखील पहा -

राज ठाकरे या मेळाव्यात म्हणाले "नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच अभिनंदन मात्र सर्वांना पक्षाची शिस्त (Party discipline) पाळावीच लागेल ज्यांना बोलावलं त्यांनीच यायचं तुम्हाला दिलेली जवाबदारी मान्य आहे ना?" असा प्रश्न गोष्टीसह पक्षासाठी शिस्त सर्वकाही आहे असं त्यांनी या भाषणात सांगितलं. तसेच पक्षांसाठी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे लोक संग्रह वाढवणे या साठी लोकांमध्ये सामिल होवून लोकांचे काम करण्याचा सल्ला ही राज यांनी यावेळी दिलाच शिवाय यासाठी त्यांनी आपल्या वडिलांचा आणि बाळासाहेब ठाकरेंचा एक किस्सा देखील सांगिंतला.

"संयुक्त महाराष्ट्र चळवळीत बाळासाहेब, (Balasaheb Thackeray) माझे वडील अग्रस्थानी होते बाळासाहेब त्यावेळी फ्री प्रेस मध्ये काम करत होते, आणि माझे वडील तेव्हा आकाशवाणी मध्ये होते. एकदा घराबाहेर चपलांचा ढीग पडला होता तेव्हा कोणी तरी बाळासाहेबांना विचारलं 'हे सगळं काय आहे '? तेव्हा बाळासाहेब म्हणाले 'ही आपली संपत्ती'.पक्ष शिस्तीचं सर्वांनाचं पालन करावं लागेल' असा किस्सा त्यांनी सांगितला.

तसेच पक्ष संघटना वाढवण्यासाठी प्रयत्न महत्वाचे आहेत त्यासाठी दिलेली जबाबदारी योग्य रित्या पार पाडा ती पार पाडणार नसाल तर आत्ताच सांगा. तसेच लोकसंग्रह ही तुमची संपत्ती, हा जुना हा नवा असं करत बसू नका, जो येईल तो आपला आहे आणि लोकसंग्रहाच्या माध्यमातून आपणाला घराघरात पोहोचणं गरजेचं असल्याचही त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना सांगितलं. तसेच आपल्या भागात राहणारे लोक माहिती पाहिजेत ते फक्त निवडणुकी पुरतं नको तसेच ते कृत्रिम नावाने आडनावाने तुम्ही ओळखलं तर ते तुम्हाला लक्षात ठेवतील मोकळे ढाकळे रहा,खोटं वागू नका असा उपदेशच राज यांनी कार्यकर्त्यांना या मेळाव्यात दिला आहे.

भागा भागात झेंडा लावा

झेंडा हे तुमचं अस्तित्व वातावरण तुमच्याकडून उभं राहणं महत्वाचं आहे. त्यासाठी प्रत्येक भागा भागात आपला झेंडा लावा असही त्यांनी सांगितल शिवाय 'महाराष्ट्रात पैसे न देता भाषण ऐकायला कोणाचं जात असेल तर ते राज ठाकरे यांचे' असं अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले हा माझा नाही, तर तो तुमचा सन्मान असल्याचही त्यांनी यावेळी सांगितलं.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EVM बिघाड, राडा, तुंबळ हाणामारी, व्हिडिओ आणि आरोपांच्या फैरी; तिसऱ्या टप्प्यात कुठं काय घडलं?

IPL 2024 DC vs RR : एकाच षटकात २ विकेट घेत कुलदीपने पालटली बाजू; घरच्या मैदानावर दिल्लीने राजस्थानचा २० धावांनी केला पराभव

Bhayandar News : सोसायटीचं फायर टेंडर दिलं नाही म्हणून अग्निशमनच्या अधिकाऱ्यांने केली बेदम मारहाण, खजिनदार गंभीर जखमी

Maharashtra Politics: निवडणूक रोखे योजनेत मोठा भ्रष्टाचार, भाजपकडून त्याच पैशाचा पश्‍चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वापर: पृथ्वीराज चव्हाण

BSP National Coordinator : मायावतींनी आकाश आनंद यांना नॅशनल कॉर्डिनेटरपदावरून हटवलं, आता जबाबदारी कोणावर?

SCROLL FOR NEXT